राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 35 आमदार फुटणार?

Eknath Shinde :  राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही ठीक

  • Written By: Published:
Eknath Shinde

Eknath Shinde :  राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात सुरु असणाऱ्या फोडाफाडीच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्याकडे देखील या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे पालघर येथे एका जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपचा (BJP) नाव न घेता टीका केल्याने राज्यात आता पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर राज्यात लवकरच राजकीय भूकंप येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तब्बल 35 आमदार फुटणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाच्या मुखपत्र सामानामध्ये करण्यात आला आहे. याचबरोबर शिंदेंच्या नाराजीनाट्याचा तिसरा अंक देखील सुरु झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नेमकं सामनामध्ये काय म्हटलंय?

‘नाराजी’ नाट्य कोसळणार! जे पेरलं तेच उगवलं, त्यामुळं शिंदे भाजपला नकोसे, शिंदेंना जागा दाखवण्यासाठी ‘लोटस’ कार्यक्रम सुरू, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाणांविरोधात तक्रारीवर अमित शाहांना हसू आवरलं नाही, जे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फुटण्याची चिंता व्यक्त करावी, हाच विनोद. सत्तापक्षांतील नाराजी नाट्य सुरूच राहील, तिसरा अंक आता सुरू झालाय. हा तिसरा अंक संपवणारी घंटा वाजत आहे अशी टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.

पालघरमध्ये नाव न घेता शिंदेंची भाजपवर टीका

तर दुसरीकडे डहाणू नगरपरिषदेच्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, डहाणूमध्ये आपण सगळे अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत. अहंकारामुळे रावणाची लंकाही जळून खाक झाली होती. आता 2 डिसेंबरला तुम्हाला तेच काम करायचं आहे असं या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

IFFI Bazaar :  इफ्फी बाजारात देशोदेशीचे चित्रकर्मी आणि माध्यमकर्मींसाठी चित्रनगरीचा स्टॉल खुला

तसेच लाडक्या बहिणांचा चमत्कार तुम्ही या आधी विधानसभेला पाहिला आहे. तुम्ही जर ठरवलं तर कुणीही आला तरी आपला विजय रोखू शकणार नाही असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.असं देखील या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

follow us