जिल्ह्याच्या काही भागात 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळीवारा व जोरदार पाऊस कोसळणार आहे.
खडकवासला, घोड धरणातून विसर्ग सुरु असल्याने भीमा, घोड नदी तसेच कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीयं. तर जामखेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपळगावचा पूल खचून गेला आहे.
सध्या राज्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. काल झालेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे.