कोसळधारा सुरूच ! भीमा, घोड नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

कोसळधारा सुरूच ! भीमा, घोड नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर – पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा (heavy rain) इशारा देण्यात आला आहे. खडकवासला, घोड आणि इतर धरणातून विसर्ग सुरु असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा, घोड नदीसेच कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील (Bhima river) नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही; रितेश भाऊनी जान्हवीला दाखवली तिची जागा 

तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर आणि नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झालेली असून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ झालेली आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. पर्यायाने ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरिकांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश, चार प्रवाशांपैकी दोन गंभीर जखमी 

नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये,अशा सूचना प्रशासनाने दिल्यात.

तसेच जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालिन परिस्थितीमध्ये नजीकच्या तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube