मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर क्रॅश, चार प्रवाशांपैकी दोन गंभीर जखमी पाहा Video
Helicopter crashed in Pune district : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना आज (दि. 24 ऑगस्ट) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण चार जण असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील पौड परिसरातील हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला आहे. उड्डाण केल्यानंतरच काही वेळातच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ॲपलचा ‘Iphone 16’ लवकरच बाजारात येणार; AI फिचर्सचं अपडेट व्हर्जन अन् काय असणार किंमत?
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काहीच वेळापापूर्वी हे हेलिकॉप्टरने पौडमधून उड्डाण केलं होतं. मात्र, काहीच क्षणात हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टर कोसळताच मोठा आवाज झाला होता. तेव्हा आम्ही आवाजाच्या दिशेने धावलो असता अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष दिसले. आम्ही पायलट आणि पीडितांना मदत आणि बचावकार्य पुरवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
पुण्यातील पौड येथे हेलिकॉप्टर कोसळले आहे. त्यात चौघे प्रवास करत होते. पायलट आणि तीन प्रवासी जखमी झालेत. #helicoptercrash #punenews pic.twitter.com/i6mghhN0U7
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 24, 2024
या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं की, हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक बिघाड होता, हेही अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचत आहेत.
Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानचं मधाळ हसू पाहून चाहते घायाळ
दरम्यान, ही दुर्घटना अत्यंत भीषण आहे. पौड परिसरातील घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पावसामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या हेलिकॉप्टरमधील पायलटसह तीन सहकारी असल्याची माहिती आहे. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. सध्या घटनास्थळी शंभरहून अधिक लोक जमा झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर आहे. AW 139 असं या हेलिकॉप्टरचं नावं आहे.
हेलिकॉप्टर मधील इसम-
1) आनंद कॅप्टन (जखमी) सदर पेशंट हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आली आहे
2) दिर भाटिया (प्रकृती स्थिर)
3) अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर)
4) एस पी राम (प्रकृती स्थिर)