नगरकरांचा बोलबाला! ‘या’ पठ्ठयांनी खरेदी केले कोटींचे हेलिकॉप्टर

नगरकरांचा बोलबाला! ‘या’ पठ्ठयांनी खरेदी केले कोटींचे हेलिकॉप्टर

Vijaykumar Sethi And Sandeep Kotkar Purchased Helicopter : प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, एकदा तरी विमान असो वा हेलिकॉप्टर (Helicopter) यातून प्रवास करावा. साधं आकाशातून हेलिकॉप्टर उडताना दिसले तरी अनेकांच्या नजर आकाशाकडे वळतात. आजवर राजकारणी किंवा व्हीव्हीआयपी लोक हेलिकॉप्टरने फिरताना तुम्ही पहिले असेल, मात्र आता काही श्रीमंत लोक देखील हौशीपोटी कोट्यवधींचा खर्च करत आपली हौस पूर्ण करताना दिसून येत आहे. याला आता अहिल्यानगर हे देखील अपवाद (Ahilyanagar News) राहिलेले नाही. कारण नगर जिल्ह्यात देखील दोघांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केलेत.

Datta Khade Exclusive : कराडमुळे गोत्यात आलेल्या खाडेंनी ‘CID’ अधिकाऱ्यांना सगळं सांगितलं!

सर्वसाधारण माणसांचे स्वप्न देखील साधारण असतात…आयुष्यात स्वतःचे हक्काचे घर गाडी हे स्वप्न देखील पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र आजकाल आता गाडी खरेदी करणे, ही एक किरकोळ बाब झाली आहे. कारण, नगर जिल्ह्यात चक्क दोघा पठ्ठ्यांनी हेलिकॉप्टर खरेदी केलंय. ऐकून तुम्हाला नवलच वाटेल आणि यापेक्षाही याची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल. कारण हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे म्हटले की, यासाठी कोट्यवधी रुपये हे मोजावे लागत असतात. मात्र नगरमधील दोघांनी स्वप्नापुढे पैशाला किंमत नसते हे दाखवून दिले. नगर जिल्ह्यातील केडगाव येथील कोतकर कुटुंब आणि राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र तथा पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्वमालकीचे खासगी हेलिकॉप्टर हे खरेदी केलंय.

नगरच्या भूमिपुत्रांनी खरेदी केले स्वमालकीचे हेलिकॉप्टर

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र आणि सध्या पुणे येथे स्थित असलेले उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्व-मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केले. ते घेऊन त्यांनी थेट राहुरी फॅक्टरी येथे दाखल झाले. सेठी यांनी सहा सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले तर त्यांच्या पाठोपाठ नगर तालुक्यातील केडगाव या ठिकाणचे कोतकर कुटुंबीय यांनी देखील कुटुंबासाठी चक्क असेच सहा आसनी हेलिकॉप्टर हे खरेदी केले. दरम्यान कोतकर यांना गेल्या 15 वर्षापासुन स्वःताचे खासगी हेलिकॉप्टर घेण्याचे स्वप्न होते. कोतकर कुटुंबियांचा हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा संकल्प 11/11/2021 रोजीचा होता. मात्र कोतकर कुटूंबियांना दरम्यानच्या काळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. 2011 मध्ये हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. मात्र, हेच स्वप्न 2025 च्या नवीन वर्षात प्रत्यक्षात साकारलं.

Ncp : शिर्डीत शिबिर होतं राष्ट्रवादीचं, पण चर्चा झाली मुंडे-भुजबळांचीच…

हेलिकॉप्टरची किंमत काय असते?

4-सीटर हेलिकॉप्टरची किंमत 3.7 कोटी रुपयांपासून सुरू होऊन 20 कोटी रुपयांपर्यंत असते. ज्यांना जलद प्रवासासाठी हेलिकॉप्टर घ्यायचे आवश्यकता आहे. दोन सीटर ते 4-सीटर हेलिकॉप्टर श्रेणी हे आकर्षक पर्याय ठरू शकतात. 4-सीटर हेलिकॉप्टर श्रेणीमध्ये, ट्रेंडी ब्रँड्स म्हणजे रॉबिन्सन R44, बेल 407 आणि एअरबस H130 हे आहे. तर 6 आसनी हेलिकॉप्टरची किंमत 8 कोटी ते 20 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असते, जी ट्रेडमार्क आणि मॉडेलनुसार बदलू शकते. हेलिकॉप्टरच्या प्रत्येक मॉडेलची क्षमता, शक्ती, कमाल वेग, कमाल उड्डाण गती आणि सहनशक्ती यावर आधारित स्वतःची क्षमता असते. त्याआधारे त्यांची किंमतही ठरवली जाते.

परवानग्या, पायलट, मेन्टेन्स खर्च…. हे जाणून घ्या

हेलिकॉप्टर खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर अगोदर अप्लाय करावा लागतो. त्यांची एनओसी घेतल्यानंतर आधारकार्ड, वोटर आयडीकार्ड, पॅनकार्ड, इन्कम टॅक्स प्रुफ आदी कागदपत्रे देऊन पुढची प्रक्रिया करता येते. याशिवाय तुम्हाला हेलिकाँप्टर खरेदी करताना तुमच्याकडे योग्य पायलट आहे, याचाही प्रुफ जोडावा लागतो. हेलिकाँप्टर खरेदी केल्यावर त्याची काळजी, सुविधा, लँन्डींग या सर्व पर्यायांचा प्रुफही द्यावा लागतो.

पायलटचा पगार ते प्रशासनाची परवानगी

हेलिकॉप्टर चालवणाऱ्या व्यक्तीकडे हेलिकॉप्टर खाजगी पायलट परवाना असणे आवश्यक आहे. या पायलटचा महिन्याचा पगार हा 40 हजारांपासून दीड लाखांपर्यंत असतो. वास्तविक हा पगार त्याच्या अनुभवावर ठरतो. एका उड्डाणासाठी थेट 40 हजार ते 70 हजार घेणारे खासगी पायलटही मिळतात. तर हेलिकाँप्टरलाही सर्विसींगची आवश्यकता असते. हेलिकाँप्टरच्या मालकाला मेन्टेनन्स रिपेअर अँण्ड ऑपरेशन म्हणजेच एमआरओ नेमावा लागतो. एमआरओची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्याही असतात. त्यांना वर्षाला 10 ते 15 लाख रुपये द्यावे लागतात. तसेच हेलिकॉप्टर उडवण्यासाठी जिल्हाधिकारी व इतर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते, त्यानंतरच हेलिकॉप्टर उडवता येते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube