Datta Khade Exclusive : कराडमुळे गोत्यात आलेल्या खाडेंनी ‘CID’ अधिकाऱ्यांना सगळं सांगितलं!

Datta Khade Exclusive : कराडमुळे गोत्यात आलेल्या खाडेंनी ‘CID’ अधिकाऱ्यांना सगळं सांगितलं!

Datta Khade CID Investigation In Walmik Karad Case : वाल्मीक कराड चौकशी प्रकरणी दत्ता खाडे (Datta Khade) यांची देखील सीआयडी चौकशी करण्यात आलीय. कराडसोबत आर्थिक व्यवहार असल्याच्या संशयावरून पुण्यातील भाजपचे (BJP) माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी केली गेली. परंतु दत्ता खाडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेत. वाल्मिक कराडसोबत (Walmik Karad Case) कधीही फोनवर बोललो नसल्याचं खाडे यांनी स्पष्ट केलंय.

ठाकरेंना मोठा धक्का! शहरप्रमुखासह 35 पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेश?

मला 19 तारखेला नोटीस मिळाली होती. त्यात तपासकामी केजला या, असं म्हटलं होतं. नोटीसमध्ये कलमं टाकलेली होती. दीड-दोन तास मी तेथे होतो. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, तुम्ही गेले तरी चालेल. कराड पुण्यात होते? ते तुमच्याकडे होते का? तुम्ही त्यांना ठेवलं होतं का? फर्ग्युसन रोडला त्यांनी प्रॉपर्टी घेतली, तेव्हा तुम्ही त्यांना मदत केली होती का? अशी प्रश्न अधिकाऱ्यांनी मला विचारले. पुण्यात त्यांनी प्रॉपर्टी घेतलीय. त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे. या व्यवहारात मी काहीतरी मध्यस्थी केली असा संशय त्यांना असेल, म्हणून त्यांनी ही चौकशी केली असेल असं खाडे यांनी सांगितलं.

दत्ता खाडे यांनी माध्यमांना सांगितलं की, मी त्यांच्या प्रश्नांना समाधानकाकर उत्तरं दिली. त्यांचा क्रमांक घेतलाय, कधीही फोन करा मी येवून जाईल असं सांगितली. कलमांच्या आधारे चौकशी करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं? वाल्मिक कराड सरेंडर होण्यापूर्वी तुमच्याकडे होते का? असं त्यांनी विचारलं. मागील वर्षी मुलाच्या लग्नात ही मंडळी होती, असं त्यांनी विचारलं. मला मीडियाच्या माध्यमातून समजलं की, त्यांनी पुण्यात प्रॉपर्टी घेतली आहे.

दक्षिण सीमेवर आणीबाणी, थर्ड जेंडर संपले; शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 13 मोठ्या घोषणा

कराडसोबत लांबपर्यंत नातं नाही. भेटण्याचा कधीही संबंध नाही आला. तो साहेबांचा एक कार्यकर्ता अन् मी पण पुण्यातील त्यांचा जवळचा कार्यकर्ता होतो. आम्ही दोघेही साहेबांचे कार्यकर्ते इतकीच आमची तोंडओळख होती. कुठेही, काहीही चौकशी केली तरी काहीच निघणार नाही. काही केलंच नाही तर काय समोर येणार, असं खाडे म्हणालेत. त्यांना मुलाच्या लग्नाची पत्रिकापण पाठवली नव्हती अन् ते आलेही नव्हती.

यापाठीमागे प्रतिमा मलिन करण्याचं राजकीय षडयंत्र असू शकतं. याला कसं डॅमेज करता येईल, हा हेतू देखील असू शकतो. ते आमच्या पक्षातील असू शकतात, विरोधी पक्षातील असू शकतात. आज न उद्या ते उजेडात येईल, असं देखील दत्ता खाडे यांनी म्हटलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube