मोठी बातमी! वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय

  • Written By: Published:
मोठी बातमी! वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचे बोललं जातंय. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्याबद्दल अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज त्याला बीड जिल्हा न्यायालयात हजर केले असता कोर्टाने वाल्मिक कराडला सात दिवसांची पाोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोठी बातमी! वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय 

वाल्मिकी कराड याला आज बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते.  एसआयटीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन बीड न्यायालयात दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयासमोर नवीन दावे आणि माहिती सादर केली गेली. यावेळी पोलिसांनी 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाकडून वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत  पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

एसआयटीचे वकिल काय म्हणाले?
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी वाल्मिकी कराडचं या प्रकरणातील इतर आरोपींशी फोनवरून बोलणं झालं होतं. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ३.१५ च्या दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी ३.२० ते ३.४० दरम्यान, आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाले. एसआयटीने न्यायालयात दावा केला की त्यांच्यात सुमारे १० मिनिटे संभाषण झाले. यावेळी वकील अशोक कवडे आणि सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात वाल्मिक कराडची बाजू मांडली.

प्रेमभंग, बेरोजगारी की नैराश्य? कुंभमेळ्यातील IIT पासआऊट अभय सिंहची कहाणी 

आरोपींना वाल्मिक कराडचे नाव घेतले…
कोणत्याही आरोपींना वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही, अशी बाजू कराडच्या वकिलांनी न्यायालयात मांडली. वाल्मिकी कराडची अटक बेकायदेशीर आहे. त्याच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्याच्यावर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. कोणत्याही आरोपीने वाल्मिकी कराडचे नाव घेतले नाही, असा युक्तीवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला.

त्यावर हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? सरपंच देशमुख हत्येच्या गु्न्हात वाल्मिक कराडचा सहभाग होता याची खात्री केली का, असे प्रश्न न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना विचारले आहेत.

दरम्यान, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे फरार असताना त्यांना कोणी मदत केली, याचा शोध घ्यायचा आहे. तसेच, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात नेमका काय संबंध आहे? याचा तपास करायचा असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube