Nepal Helicopter Crash: नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत

Nepal Helicopter Crash: नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत

Nepal Helicopter Crash:  नेपाळमध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून रिपोर्टनुसार, हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. सर्व 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पाच परदेशी नागरिक होते.

नेपाळच्या शोध पथकाने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष बाहेर काढले आहे. कोशी प्रांत पोलिसांचे डीआयजी राजेशनाथ बास्तोला यांनी एएनआयला सांगितले की, ‘गावकऱ्यांनी नेपाळ शोध पथकाला हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. विशेष म्हणजे मनांग एअरचे हे हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी १०.१० मिनिटांनी उड्डाण घेतल्यानंतर १५ मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.

NCP Political Crisis: राष्ट्रवादी खरी कोणाची? शरद पवार की, अजित पवार ‘या’ फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मनांग एअर हेलिकॉप्टरचा मंगळवारी सकाळी संपर्क तुटला आणि सोलुखुंबू जिल्ह्यातील लिखुपिके ग्रामीण नगरपालिकेतील लामजुरा येथे अपघात झाला. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हेलिकॉप्टर डोंगराच्या माथ्यावर असलेल्या झाडावर आदळल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा अपघात झाला. राजेशनाथ बास्तोला यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. मनांग एअर ऑपरेशन्स आणि सिक्युरिटी मॅनेजर राजू न्यूपेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन चेत बहादूर गुरुंग यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये पाच मेक्सिकन नागरिक होते.

लोकसभेत महाराष्ट्राचा डंका! सुजय विखे पाटलांसह 5 नवोदित खासदार चमकले

विशेष म्हणजे अपघाताचा बळी ठरलेले हेलिकॉप्टर जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या सहलीसाठी पाच परदेशी पर्यटकांना घेऊन जात होते. वृत्तानुसार, सोलुखुंबू ते काठमांडू या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, बेपत्ता हेलिकॉप्टरचा सकाळी 10:15 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube