लोकसभेत महाराष्ट्राचा डंका! सुजय विखे पाटलांसह 5 नवोदित खासदार चमकले

लोकसभेत महाराष्ट्राचा डंका! सुजय विखे पाटलांसह 5 नवोदित खासदार चमकले

नवी दिल्ली : खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यासह महाराष्ट्रातील 5 खासदार लोकसभेत चमकले आहेत. लोकसभा (Lok Sabha) सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग घेणाऱ्या टॉप 10 नवोदित खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 5 खासदारांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे, सुनिल तटकरे, शिवसेनेच्या संजय मंडलिक आणि भाजपच्या सुजय विखे पाटील, उन्मेष पाटील या खासदारांचा समावेश आहे. (5 MPs from Maharashtra are among the top 10 debutant MPs who participated in the most debates)

आकडेवारीनुसार पाहायचे झाल्यास, 554 चर्चांमधील सहभागासह राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर 522 चर्चांसह शिवसेनेचे संजय मंडलिक पाचव्या क्रमांकावर आहेत. यानंतर सहाव्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आहेत. त्यांनी तब्बल 506 चर्चांमध्ये सहभाग नोंदविला आहे. भाजपचे सुजय विखे पाटील हे या यादीत 492 चर्चांमधील सहभागासह आठव्या क्रमांकावर आहेत. तर 460 चर्चांसह जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा दहावा क्रमांक आहे.

शिंदे सरकारसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! 12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा; SC ने स्थगिती उठवली

यंदाच्या 17 व्या लोकसभेत 270 खासदार असे आहेत जे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. हा आजवरचा नवोदित खासदार निवडून येण्याचा सर्वाधिक आकडा आहे. या खासदारांपैकी बरेच जण सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. मंत्री न झालेल्या 250 नवोदित सदस्यांसाठी संकलित केलेल्या डेटानुसार, या खासदारांनी 41,104 प्रश्न विचारले. तर 685 खाजगी विधेयके आणली आहेत. याशिवाय सभागृह नियम 377 अंतर्गत 1,908 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह काही सत्रांमध्ये व्यत्यय आल्यामुळे या खासदारांनी सूचिबद्ध केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सभागृहातील मंत्र्यांनी दिली नाहीत. मात्र अनुत्तरित परंतु सभागृहाच्या कार्यसूचीमध्ये सूचिबद्ध असलेल्या सर्व प्रश्नांसह, लेखी उत्तर मिळविली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधोरेखित केले की, भारतीय जनता पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम आणि शिवसेनेसह पक्षांनीही अनेकदा आपल्या नवीन सदस्यांना कामकाजात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. अनेक सदस्यांनी एक नवीन संसदीय रेकॉर्ड तयार केला आहे.

’60 व्या वर्षीही मी मुख्यमंत्री, मुलगा मंत्री अन् पत्नी एवढचं’ बावनकुळेंनी वाचला ठाकरेंच्या कर्तृत्त्वाचा पाढा

दरम्यान, बिर्ला यांनी नवोदित खासदारांची संख्या लक्षात घेऊन आणि त्यांना बोलण्याची अधिक संधी मिळावी म्हणून जून 2019 मध्ये बिर्ला यांनी शून्य प्रहर वाढवला. याशिवाय अधिक नवोदित खासदारांना सभागृहात बोलता यावे यासाठी दुपारच्या जेवणाची वेळ बदलली.

दरम्यान, याबाबत बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, “हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत संभाषण असल्यामुळे त्यांना संसदेत बोलणे सोपे झाले. माझे कान नेहमी जमिनीवरील समस्यांकडे लागून राहिलेले असतात. जेव्हा तुम्ही लोकांना भेटता तेव्हा त्यांना काय म्हणायचे आहे ते ऐका, त्यामुळे त्यांच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडणे सोपे होते. माझ्या शिक्षणानेही मला खूप मदत केली, मला समस्या समजून घेणे सोपे जाते.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube