मोठी बातमी! इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघात मृत्यू, इराणला मोठा धक्का

मोठी बातमी! इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघात मृत्यू, इराणला मोठा धक्का

Ebrahim Raisi : रविवारी (दि. 20 मे) रोजी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) याचे हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crashed) होते. बचाव पथक त्यांच्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध घेत होते. दुर्घटनेनंतर तब्बल 16 तासांनी बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध घेण्यास यश मिळालं. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये कुणीही जिवंत आढळून आलं नाही. रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Loksabha Election : शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? ईव्हीएम मशीनला घातला हार! 

रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा रविवारी दुपारी १ वाजून वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता अपघात झाला. अझरबैजानमधील एका धरणाचे उद्घाटन करून इराणचे राष्ट्राध्यक्ष हेलिकॉप्टरने परतत होते. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होती. दोन हेलिकॉप्टर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले होते. मात्र, तिसरे विमान पोहोचले नाही. टेकऑफनंतर ३० मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. प्रयत्न करूनही हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर बचाव पथक रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी 16 पथके कामाला लागली होती. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरण बदललं; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा 

दरम्यान, आता पथकांना अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सापडले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील इब्राहिम रईसी आणि इतरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. रईसी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या परराष्ट्रमंत्र्यांचाही मृत्यू झाला आहे. इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत रईसी ?
63 वर्षीय रईसी हे कट्टरपंथी आहेत. राष्ट्रपती होण्यापूर्वी ते देशातील न्यायव्यवस्थेचा कारभार पाहत होते. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचे ते शिष्य आहेत. गेल्या वर्षी ते राष्ट्रपती झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज