Loksabha Election : शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? ईव्हीएम मशीनला घातला हार!

Loksabha Election : शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? ईव्हीएम मशीनला घातला हार!

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. राज्यात १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघाशिवाय, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या सहा मतदारसंघात (Maharashtra Lok Sabha Election) मतदान सुरू झालं. दरम्यान, नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) ईव्हीएमशीनला हार घातला.

मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरण बदललं; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा 

सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी पहिला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या विरोधात तक्रार झाली तर शांतीगिरी महाराजांच्या अडचणीत येऊ शकतात. यापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शांतीगिरी महाराजांच्या अडणतीत वाढ होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

हार का घातला ?
मतदान ही अत्यंत पवित्र प्रक्रिया आहे. या मशिनजवळ येऊन सर्व नागरिक मतदान करणार आहेत. त्या सर्वांना सद्भबुध्दी यावी, त्यांचं मत भारत मातेच्या कामात यावं. भविष्यात कुणालाही पश्चिताप करायची वेळ येऊ म्हणून पवित्र हार आम्ही ईव्हीएम मशीनला घातल्याचं शांतीगिरी महाराजांनी सांगितलं.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितलं की, समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदू संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, यंदा आमजा विजय होईल, असा दावा शांतीगिरी महाराजांनी केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

नाशिकमध्ये तिरंगी लढत….
नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून राजाभाऊ वाझे हे रिंगणात आहेत. नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

ठाण्यातील नौपाड्याला मतदान यंत्रात बिघाड
ठाण्यात नौपाडा मतदारसंघात सकाळी तासाभरापासून मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी मतदान केंद्रांवर दाखल होत मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube