Video : सुषमा अंधारे थोडक्यात बचावल्या, उड्डाणापूर्वीच डोळ्यासमोर हेलिकॉप्टर झालं क्रॅश

Video : सुषमा अंधारे थोडक्यात बचावल्या, उड्डाणापूर्वीच डोळ्यासमोर हेलिकॉप्टर झालं क्रॅश

Sushma Andhare Helicopter Crash : महाड येथे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची मोठी घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आले होते. दरम्यान, हेलिकॉप्टर अचानक क्रॅश (Helicopter Crash) होऊन त्याचे जागीच तुकडे झाल्याची भयानक घटना येथे घडली. मात्र, घटनेत सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सुषमा अंधारे आणि या हेलिकॉप्टरचा पायल सुखरूप आहे. दरम्यान, हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही

 

पायलट सुखरूप

बारामती येथे महिला मेळावा आयोजीत केलेला असून त्यासाठी सुषमा अंधारे जाणार होत्या. त्यासाठी महाड येथे त्यांना हे हेलिकॉप्टर घेण्यासाठी आलं होतं. त्यावेळी सुषमा अंधारे जाण्यासाठी हेलिपॅडवर पोहचल्या त्याच दरम्यान, हा अपघात झाला. यामध्ये हेलिकॉप्टरचे अनेक तुकडे झाले. हे सगळ घडलं असलं तरी सुदैवाने हेलिकाप्टरचा पायलट सुखरूप आहे.

 

महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक

2022 च्या दसरा मेळाव्यानंतर प्रामुख्याने प्रकाशझोतात आलेल्या सुषमा अंधारे आक्रमक नेत्या आहेत. सुषमा दगडू अंधारे असं त्यांचं नाव असून, त्या पेशाने वकील आहेत. त्यांचा राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषायात अभ्यास आहे. त्या विषयाच्या त्या व्याख्यात्या आहेत. सध्या त्या महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube