Video: जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मोहरी तलाव ओव्हर फ्लो, कुठ किती झाली नोंद?

Video: जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मोहरी तलाव ओव्हर फ्लो, कुठ किती झाली नोंद?

Ahmednagar Rain : जामखेड मोहरी परीसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने (Rain) नागरिकांची तारांबळ उडाली. जामखेड शहरातील शिवाजीनगर, (Ahmednagar ) संभाजीनगर तसेच जामखेड नगर रस्त्यावर आणि नाल्यात पूरसदृश पाण्यामुळे वाहतूक चार तास खोळंबली होती त्यामुळे परिसराचा संपर्क तुटला होता.

एकाच पावसाने ओव्हर फ्लो

परिसरात झालेया जोरदार पावसामुळे परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते तर मोहरी परिसरात पावसामुळे नदी ओढ्याकाठची शेती वाहुन गेली. तर अनेक ठिकाणी पिके पाण्या खाली गेली आहेत. मोहरी तलाव या एकाच पावसाने ओव्हर फ्लो झाला आहे. तसंच, पाथर्डी तालुक्यात ७७ मि.मी. पाऊस झाला. जामखेड मंडळात ९३.५, खर्डा ९२.३,

तलाव ओव्हरफ्लो मराठवाडा भूकंपाने हादरला; नांदेड परभणीसह हिंगोली जिल्ह्यात धक्के, प्रशासन ॲक्शन मोडवर

मोहरी परिसरात जोरदार पावसामुळे नदी, ओढ्याकाठची शेती वाहून गेली. तर अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली आहेत. मोहरी तलाव एकाच पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. दरम्यान, खर्डा येथील कौतुका नदी व दरडवाडी येथील नदीला पूर आला होता. पैठण-पंढरपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

तालुकानिहाय पाऊस

नगर २३.५, पारनेर १२.४, कर्जत २९.५, श्रीगोंदा ३१.८, जामखेड ७७, पाथर्डी ५५.९, नेवासा २१.१, शेवगाव १२.८, राहुरी १५.२, संगमनेर १५, अकोले १७.८, कोपरगाव १०.२, श्रीरामपूर १४.३, राहाता १३.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज