अहमदनगर जिल्ह्यातील नद्यांमध्ये विसर्ग वाढला, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात आतापर्यंत 343.5 मिमी पाऊस झाला आहे. तर लगतच्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. परिणामी, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून अहमदनगरला येणाऱ्या नद्या आणि धरणांच्या पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता (increase in water level of dams)आहे. नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावे, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.
जिल्ह्यात सरासरी पर्जन्याच्या 76.66% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. आज दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून 44 हजार 768 क्युसेक, भीमा नदीत दौंड पूल येथून 74 हजार 456 क्युसेक, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 27 हजार 114 क्युसेक्स, निळवंडेतून 21 हजार 855 क्युसेक ओझर बंधारा येथून 1 हजार 392 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. कुकडी नदीत येडगाव धरणातून 7 हजार 500 क्युसेक, घोड नदीत घोड धरणात 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.
गौतम गंभीरचं प्रशिक्षकपद राहणार औटघटकेचं; वर्ल्डकप हिरो खेळाडूचं मोठं भाकित
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून खडकवासला व इतर धरणांतून विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पर्जन्यमान सुरू असून दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गात वाढ होत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गात वाढू होऊ शकते. त्यामुळं अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झालेली असून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ झालेली आहे. याशिवाय निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरूच असून, संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गात वाढू शकते. पर्यायाने ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्जन्यामुळे येडगाव धरणातून कुकडी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळं अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कुकडी नदी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळं घोड धरणाची पाणी पातळी वाढत असून घोड धरणातून घोड नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, नाले, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असं आवाहन प्रशानसाने केलं.
याशिवाय, जुनाट/ मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळं भूस्खलन होण्याची आणि दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगून वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. घाट रस्त्यावरने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये. आपत्कालीन स्थितीत जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं.