कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यांच्यापासून ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका; आंबेडकरांचं मोठं विधान

कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यांच्यापासून ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका; आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) गेल्या एक ते दीड वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. आम्हाला ओबीसींतूनच आरक्षण हवे असून सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षण हवं, अशी भूमिका जरांगेंनी घतली. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला. अशातच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका असल्याचं वक्तव्य केलं.

गौतम गंभीरचं प्रशिक्षकपद राहणार औटघटकेचं; वर्ल्डकप हिरो खेळाडूचं मोठं भाकित 

प्रकाश आंबेडकर आज यवतमाळ येथे आरक्षण बचवा यात्रेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, कुणबी मराठ्यांपासून सावध राहा, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

मोठी बातमी! भारतीय संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत दाखल, पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णय 

यवतमाळमध्ये बोलतांना आंबेडकर म्हणाले की, कुणबी मराठ्यांपासून सावध रहा. कुणबी हे स्वत:ला ओबीसी समजत असले तरीही सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असं आमदार सांगतो. याचाच अर्थ तो आमदार धनगरांबरोबर,माळी समाजाबरोबर, वंजारी, लिंगायत, बंजारा समाजाबरोबर नाही. तसंच तेली, तांबोळी, लोहार, सोनार यांच्याबरोबर तर अजिबात नाही, असं आंबेडकर म्हणाले.

Video: संख्याबळ आणि भाजपचं संघटन पाहून विधासभेला जागा मिळाव्यात, राम शिंदेंची सूचक प्रतिक्रिया 

पुढं बोतलांना आंबेडकर म्हणाले की, मी तुम्हाला जे सांगतो आहे, ते लक्षात घ्या. ओबीसी आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 टक्के आहे. निवडणुक पार पडल्यानंतर हा धोका निर्माण होईल हे विसरू नका. तसंच जानिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली.

ते म्हणाले, कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. विधीमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार आहेत. तर ओबीसी आमदार हे केवळ 11 ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका आहे, असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube