पवारांनी 50 वर्षात मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही?, चंद्रकांत पाटलांनी डागली तोफ
Chandrakant Patil on Sharad Pawar : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला. तर ओबीसी आरक्षण हक्कांच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाकेंनी उपोषणाचे हत्यार उपसले. यातच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली.
क्रिकेट विश्वात शोककळा! माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनचा निधन
शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. मग त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल पाटील केला.
चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आज राजकीय स्वार्थापोटी समाजाचे तुकडे पाडले जात आहे. हे योग्य नाही. अनेक संत-महंतांनी समाज एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुणीही तेल टाकण्याचे काम करू नये. तुम्हीही त्यात भस्म व्हाल. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. मात्र ते न्यायालयात टिकू शकले नाही. त्यानंतर त्यांनी अगोदरच्या त्रुटी दूर करून 10 टक्के आरक्षण दिले, असं पाटील म्हणाले.
विखेंची याचिका फेटाळली, पण मतांची पुन्हा तपासणी कशी होते ? जाणून घ्या ए टू झेड माहिती
यावेळी बोलताना पाटील यांनी शरद पवारांवरही तोफ डागली. शरद पवार 50 वर्षे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही?, असा सवाल त्यांनी केला.
पुढं बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, रक्ताचे नातेवाईक असणाऱ्या कुणालाही जात पडताळणी करण्याची गरज नाही. मात्र सरकारने त्यात काही खोट करून ठेवली आहे,असा जरांगेंचा दावा आहे. पण ब्लड रिलेशनशिप (रक्ताचे नातेवाईक) आणि सगेसोयरे हा एकच शब्दच आहे, हे आम्ही त्यांना पटवून देऊ… जरांगेंच्या सूचनेनुसार सरकारने सगेसोयरेची अधिसूचना काढली. आता त्यांना आणखी काय हवे आहे, हे पाहिलं पाहिजे, असंही पाटील म्हणाले.
दरम्यान, मोफत मुलींच्या शिक्षणावरून घोषणा केल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला. पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर त्याचा जीआर जारी केला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.