मनोज जरांगे हा भंपक माणूस, त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी…; लक्ष्मण हाके संतापले

मनोज जरांगे हा भंपक माणूस, त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी…; लक्ष्मण हाके संतापले

Laxman Hake on Manoj Jarange : मराठा आरक्षणाविरोधात (Maratha reservation) ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपोषण छेडले आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) संरक्षणार्थ त्यांनी उपोषण सुरू केलं. तर मनोज जरांगेंनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. दरम्यान, आज जरागेंनी ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याची टीका केली. त्या टीकेला आता हाकेंनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं.

बारामतीत नेत्याचं दुकान काही चाललं नाही…; शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा 

राज्यात गेल्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाबाबत आधी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसले. जरांगे पाटील हे मराठा आरक्षण ओबीसीतूनच द्यावे, या मागणीवर ठाम आहेत. तर हाके ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आज हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जरागेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की,मनोज जरांगे हा भंपक माणूस असून त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. त्यांच्या टीमने आधी माझ्यासमोर चर्चेसाठी यायला हवं. मी मीडियासमोर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी कायद्याने उत्तर द्यावी, असं आव्हान लक्ष्मण हाके यांनी केलं.

विधान परिषद निवडणूक : महायुतीला महिन्याच्या आत दुसरा दणका? मविआचे तगडे प्लॅनिंग 

तसेच ओबीसी आंदोलनाची सरकारने दखल घेलती असून येत्या दोन दिवसांत एक शिष्टमंडळ हाके यांची भेट घेणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. याविषयी विचारले असता हाके म्हणाले, त्यांना सुबुध्दी देवो आणि ते लवकर येवा… दोन दिवसांत नाही तर आठ दिवसांत आले तरी चालेल. मी मेलो तरी मला काही हरकत नाही. मी काही मोठा माणूस नाही. त्यामुळं यांना काही फरक पडत नाही, अशी टीका हाकेंनी केली.

जरांगेंची टीका काय?
आम्ही जसं आंदोलन करत आहोत, तसाच ओबीसींना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही कोणाला रोखणार नाही, कोणाला रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचे आंदोलन करावं. आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू आणि आमच्या मागण्या मांडू. पण, राज्यात सुरू असलेले ओबीसी आंदोलनं ही सरकार पुस्कृत आहेत. याआधीचे आंदोलन आणि आताचे आंदोलन पाहिले की, हे लक्ष्यात येते, अशी टीका जरांगेंनी केली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज