Rohit Pawar : अजितदादांच्या खांद्यावरुन चालवायचीय, रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार

Rohit Pawar : अजितदादांच्या खांद्यावरुन चालवायचीय, रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार

Rohit Pawar On Chandrakant Patil : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी निवडणुकीत शरद पवार यांचा पराभव करणं हेच भाजपचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, महायुतीत आम्ही त्यांचं…

आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सहा दशकं महाराष्ट्राची व देशाची सेवा करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य असल्याचं चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं, पण त्यासाठी बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरुन चालवायचीय…. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची निती जगजाहीर आहे.

त्यामुळं ज्यांनी आपल्याला या स्थानापर्यंत पोचवलं त्या आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी आपला वापर करुन द्यायचा की नाही, हे आता अजितदादांनीच ठरवायचंय आणि त्यांना ठरवता येत नसेल तर त्यांच्यासोबत असलेल्या पण आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ते ठरवावं! शिवाय पवार साहेब ही व्यक्ती नाही तर विचार आहे, तो संपवणं भाजपला कदापि शक्य नाही, हेही भाजपाने लक्षात ठेवावं!

Bihar Politics : बिहारमध्ये NDA ला धक्का! जागावाटपानंतर केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजीनामा

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष केला आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणात तराजू लावायचा असतो, काय वजनदार? काय हलकं? हे पाहायचं असतं. आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त वजनदार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

2019 मधलं सरकार कुणामुळं गेलं? आज तुम्ही घरात फूट पाडली असं म्हणता, पण 2019 मध्ये लोकांनी मतदान करुन 161 जागा आमच्या निवडून दिल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. मग ती आमच्यात पवारांनी फूट पाडली ती फूट नव्हती का? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

शरद पवारांचा हिशोब चुकता करण्याची संधी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मिळाली असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. हे सर्व बोलत असताना राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर या त्यांच्या शेजारीच बसलेल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज