राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, महायुतीत आम्ही त्यांचं…

राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, महायुतीत आम्ही त्यांचं…

Chhagan Bhujbal on Raj Thackeray : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या घडामोडीचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांचं स्वागतच आहे, असे भुजबळ म्हणाले.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा आदेश! ‘त्या’ वादात पडू नका; निवडणुकीची तयारी सुरू करा

भुजबळ पुढे म्हणाले, राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा सुरू आहे. एकदा जागावाटप झालं की बाकीच्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचं स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची ताकद वाढणार आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत हे नातं आणि संबंध कामी येतील, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारीच दिल्लीत गेले आहे. त्यानंतर राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीमध्ये गेल्यास त्यांना दोन लोकसभा जागा दिल्या जाऊ शकतात. दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेला हवे आहेत.

महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) हाही महत्त्वाचा पक्ष आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा एकमेंकाना भेटलेले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना बरोबर घेण्यास तयार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारपरिषदेत राज ठाकरे आमची विचारधारा मानणारे नेते आहेत. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

‘पूर्वीचे ठाम अन् परखड राज ठाकरे शोधतोय : मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीच्या चर्चांवर थोरातांची खोचक टीका

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज