सतरा हजार पोलिस भरतीपासून मराठा आरक्षणाचा आरंभ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Maratha-reservation-with-seventeen-thousand-police-recruitment: मुंबई : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या आठवड्यात आरक्षण लागू करण्याबाबत परिपत्रकही सरकारने काढलेले आहे. मराठा आंदोलक Manoj Jarange : “मला शंभर टक्के अटक करणार”; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा (Manoj Jarange) यांनी घेरलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या खात्यातील पोलीस भरतीपासून मराठा आरक्षणाचा प्रारंभ होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ही घोषणा केली. तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी याबाबत भूमिका मांडली.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू होणार; CM शिंदेंची घोषणा
2022-2023 मध्ये रिक्त झालेल्या शंभर टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात 17 हजार 471 इतकी पोलिस भरती होणार आहे. या भरतीत दहा टक्के जागा मराठा समाजातील तरुणांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण देऊनही मनोज जरांगे पाटील हे फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. यावर फडणवीस म्हणाले, मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणे हे उद्दिष्ट होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. त्यासाठी आम्ही राज्य मागासवर्गीय आयोग हा नव्याने गठीत केला. चार लाख लोकांनी अडीच कोटींपेक्षा जास्त घरात जावून सर्वेक्षण केले आहे. त्या आधारे मराठा समाजामध्ये सामाजिक व आर्थिक मागासलेले पण सिद्ध करून आरक्षण दिले आहे. असेच दिले पाहिजे. तसेच दिले तर चालणार नाही, या गोष्टीला अर्थ नाही, असे फडणवीस म्हणाले.
Jayant Patil : शेलार अन् कदमांना समज द्या, योगेश सावंतावरून जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दाखवला आरसा
जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसादही दिला आहे. मुख्यमंत्री स्वतः त्यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते. आरक्षण दिल्यानंतर आता कुठे तरी राजकारण होत आहे. या विषयाचे राजकीयकरण होत आहे. जरांगे मध्यंतरी ज्या पद्धतीने बोलले आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार गट बोलतोय असे वाटत होते. त्यांचे वाक्य जरांगेंच्या तोंडातून येत होते. त्यामुळे कुठेतरी संभ्राम तयार करण्यात येत होता, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. आता आरक्षण मिळाले आहे. पोलिस भरतीपासून आरक्षण लागू करण्यात आले आहेत. आता उगाच वेगवेगळ्या पध्दतीने तरुणांनी माथेफिरुपणा करू नये. त्यातून केसेस होतात. करिअर बर्बाद होते. त्यामुळे मोठ्या मनाने आरक्षणानुसार समाजाला अधिक कसा फायदा होईल ते शोधले पाहिजे, असे आवाहनच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.