Jayant Patil : शेलार अन् कदमांना समज द्या, योगेश सावंतावरून जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दाखवला आरसा

Jayant Patil : शेलार अन् कदमांना समज द्या, योगेश सावंतावरून जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दाखवला आरसा

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी योगेश सावंत यांच्या व्हिडीओवरून सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. पाटील म्हणाले की, आपल्या सभागृहाला ऐतिहासिक परंपरा आहे. इथे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला मोल असतो. त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अनादर करणाऱ्या सदस्यांना समज द्यावी. असं म्हणत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही पानं…; CM शिंदेंनी टीका करत वाचली सरकारच्या कामांची यादी

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आपल्या सभागृहाला ऐतिहासिक परंपरा आहे. आपण सर्वांचा आदर करत असतो. पण सभागृहाचे सदस्य जर सभागृहाचा अनादर करू लागले तर ते योग्य ठरणार नाही. इथे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला फार मोल असतं. त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊ नये. असा आपला संकेत आहे. त्यामुळे सभागृह आणि अध्यक्षांचा आव्हान होतो. काल सभागृहामध्ये एका व्हिडिओवरून गोंधळ झाला. त्यावर आशिष शेलार आणि राम कदम यांनी भूमिका मांडली.

डिनर डिप्लोमसीवर शरद पवार ‘हिट विकेट’; CM शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आग्रहाचं निमंत्रण नाकारलं

या दोन्ही सदस्यांनी व्हिडिओमधील व्यक्ती योगेश सावंत असल्याचे सांगितलं. त्यांच्यावर विविध आरोप केले. मात्र त्या व्हिडिओतील व्यक्ती योगेश सावंत नसून त्यांनी केवळ हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे शेलार आणि कदम यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी किंवा राजकीय आरोप करण्यासाठी ही चुकीची माहिती दिली. त्यातून सभागृह आणि अध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे ते तपासून ते पटलावरून काढून टाकावा. तसेच पुन्हा चुकीची माहिती सभागृहात दिली जाऊ नये. यासाठी संबंधित सदस्यांनी काळजी घ्यावी. अध्यक्षांनी त्यांना समज द्यावी अशी आमची विनंती आहे.

नेमकं प्रकरण काय?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे झाले. यामध्ये सांताक्रुझ पोलिसांनी (Santa Cruz Police) अटक केलेल्या योगेश सावंत (Yogesh Sawant) प्रकरणी भाजप आमदारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत भाजप आमदार राम कदम यांनी देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केल्याचा दावा केला. एका व्हायरल क्लिपममध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र दिसत आहे.

Akshay Kumar भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार? सर्वत्र चर्चांना उधाण

व्हिडिओमध्ये एक इसम म्हणतो की, देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीस यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवून टाकू. याचं नाव आहे योगेश सावंत. याचे संबंध बारामतीहून आहेत. तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार व शरद पवारांचा नातून रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो. काय संबंध हे रोहित पवारचा? असा सवाल कदम यांनी केला.

रोहित पवार म्हणाले योगेश सावंत कार्यकर्ता

रोहित पवार यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं होतं. त्याचा जबाब घेतला. आता त्याला कोर्टात नेत आहे. मी त्याला स्वत: भेटण्यासाठी चाललो आहे. उगाच सत्ताधाऱ्यांनी तिथं अॅक्टिंग करू नये. जाहीरपणे सांगतोय ना, तो आमचा कार्यकर्ता आहे, असं रोहित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज