Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षण लागू; शासन निर्णय जारी

Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षण लागू; शासन निर्णय जारी

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आरक्षणावर अंमलबजावणी केली आहे. काल 26 फेब्रुवारीपासून आरक्षण लागू केलं आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारकडून काढण्यात आलं असून या आरक्षणाचा फायदा मराठा मुला-मुलींना होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गदारोळ, आंदोलकाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत अनेकदा आमरण उपोषण करुन सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला होता. जरांगे यांच्या प्रत्येक आंदोलनादरम्यान, सरकार आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी मुदत घेत होते. अखेर ज्या मराठा बांधवांच्या नोंदी मिळालेल्या नाहीत अशा मराठा बांधवांसाठी सरकारने विशेष अधिवेशनात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आता अंमलबजावणी करण्यात आली आहे.

अजितदादा तयारीला लागले : शिंदे आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ

एकीकडे राज्यात सध्या मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्यात धुमश्चक्री सुरु असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच आत्ता वातावरण तापलेलं असतानाच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर अंमलबजावणी केली आहे. कालपासून मराठा मुला-मुलींना दहा टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, यामध्ये सध्या सुरु असलेल्या नोकर भरती प्रक्रियेमध्ये हे आरक्षण लागू नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पत्रकार पोपटलाल! तुमचा पराभव अटळ, तुमच्या गटासाठी नँनो गाडी…; आशिष शेलारांची राऊतांवर टीका

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजासाठी आज आनंदाचा, समाधानाचा दिवस असून मराठा आरक्षण लागू झालं आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयानंतर आज अखेर जीआर निघाला आहे. मराठा समाजातील मुला-मुलींना नोकऱ्या आणि शिक्षणांमध्ये या आरक्षणाचा फायदा होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी जे बोललो होतो ते पूर्ण करण्याचं भाग्य मला लाभलं असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=XuLEV9soiF8

follow us
  • fb
  • instagram
  • youtube