पत्रकार पोपटलाल! तुमचा पराभव अटळ, तुमच्या गटासाठी नँनो गाडी…; आशिष शेलारांची राऊतांवर टीका

  • Written By: Published:
पत्रकार पोपटलाल! तुमचा पराभव अटळ, तुमच्या गटासाठी नँनो गाडी…; आशिष शेलारांची राऊतांवर टीका

Ashish Shelar on Sanjay Raut : सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वार वाहत आहेत. त्यामुळं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजप आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर जोरदार टीका केली. तर आज माध्यमांशी बोलतांना मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) टीकास्त्र डागलं होतं. यावरून आता भाजप आमदार आशिष शेलारांनी (Ashish Shelar) राऊतांवर जोरदार टीका केली. त्यांना राऊतांचा उल्लेख पत्रकार पोपटलाल असा केला.

Nitin Gadkari यांच्या हस्ते ‘तेरव’ चा ट्रेलर लॉन्च; विदर्भातील चित्रपटांना दिली कौतुकाची थाप! 

आशिष शेलारांना राऊतांना केलेल्या टीकेनंतर एक्सवर एक पोस्ट लिहिली.त्यात त्यांनी लिहिलं की, ही तर तुमची अखेरची घरघर! पक्ष गेला, चिन्ह गेले, खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक गेले… जो शिल्लक गट दिसतोय ते घेऊन पत्रकार पोपटलाल जो थयथयाट करीत आहेत, तो म्हणजे त्यांच्या गटाची अखेरची घरघर, अशी टीका शेलारांनी केली.

पुढ त्यांनी लिहिलं की, गट केवढा, आणि आवाज केवढा? पण, अखेरच्या घरघरीचा आवाज मोठाच असतो म्हणा ! 2024 नंतर महाराष्ट्रात भाजपा कुठे असेल? याची चिंता तुम्ही करु नका! छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाच आणि तुमच्या पक्षा सारख्या बांडगूळाना दिल्ली दाखवली ती सुध्दा भाजपानेच ! तुमचा सडकून पराभव अटळ आहे. तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार हे निश्चित आहे. “हग्रलेख” आजच लिहून ठेवा! तुम्ही तुमच्या गटासाठी नँनो गाडी तेवढी बुक करुन ठेवा, असंही शेलार म्हणाले.

Sanya Malhotra Birthday : पदार्पण ते स्टारडम बर्थडे गर्ल सान्या मल्होत्राची यशस्वी कामगिरी 

राऊत नेमकं काय म्हणाले?
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे. त्या हुकूमशाहीचे नेतृत्व भारतीय जनता पक्ष करत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व छोट्या पक्षांना कायमचे संपवण्याची भाषा करणे हे त्याच हुकूमशाही प्रवृत्तीचे लक्षण आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनीही आगामी काळात शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपूव व देशात फक्त भाजप हा एकमेव पक्ष उरेल, अशी पिपाणी फुंकली होती. आता बावनकुळे यांनीही तोच सूर पुढे नेल्यचाी टीका राऊतांनी केलाी.
भाजपच्या मनात काँग्रेस विषयी तिटकारा आहे. व त्यांनी कॉंग्रेसयुक्त भारताचा नारा दिला. पण गेल्या दहा वर्षात काँग्रेस संपलेली नाही, तर भारतीय जनता पक्षाच काँग्रेसयुक्त झाला, असं राऊतांनी अग्रलेखात म्हटलं.

फडणवीसांवर काय टीका केली?
आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांवर जोरदार टीका केली. जरांगेंचा बोलविता धनी कोण? हे जर फडणवीसांना माहित नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. हे तुम्हाला माहित नसेल तर तुमच्याकडे गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का, असा सवाल राऊतांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube