Manoj Jarange : “मला शंभर टक्के अटक करणार”; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Manoj Jarange : “मला शंभर टक्के अटक करणार”; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) विरोधात राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल विधानसभेच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रिया येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य सरकारकडून दडपशाही सुरू आहे. मला शंभर टक्के अटक करण्यात येणार आहे, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Manoj Jarange : ‘चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो’ SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

जरांगे पुढे म्हणाले, आंतरवाली सराटीतील मंडप काढू नका. आंतरवालीच्या लोकांना अटक करू नका, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मुंबईला रॅली नेल्यापासून ट्रॅप रचला जात आहे. माझ्यावर दडपण आणले जात आहे. मला १०० टक्के अटक करणार आहेत. माझ्यासाठी एसआयटी का? काय केले असे मी? सहा महिन्यांपासून आम्हाला फसवले जात आहे. गुन्हा दाखल करुन देखील मराठे खचले नाहीत, घाबरले देखील नाहीत. राज्य सरकारचं १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असा दावा जरांगे पाटील यांनी केला. गृहमंत्री यांनी सारथी दिले, महामंडळ दिले म्हणतात मात्र विद्यार्थांना विचारून बघा किती जाचक आटी आहेत. त्याचा किती फायदा झाला विचारून बघा.

महाराष्ट्रातील मराठा समाजात चलबिचल व्हायला नको. आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे ती कायम राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतची आंदोलने स्थगित केली आहेत. या आंदोलनांचे रुपांतर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणात करा. सरकारकडून दडपशाही सुरू आहे. अंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे. तो मंडप काढू नका तुमची दडपशाही बंद करा. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना ई मेल करायला सुरुवात करा. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा असा मेल करा. सर्व काही शांततेत करायचे आहे. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

आम्ही शांततेत आंदोलने केली तरी सुद्धा गुन्हे दाखल केले. सरकारने ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप बंद केले. इंग्रजांनी देखील एवढे केले नसेल एवढा जातीयवाद सध्या सुरू आहे. माझी चूक असती तर मी समाजापुढे कान धरले असते. माझी मराठा समाजाला विनंती आहे. एकजूट फुटू देऊ नका तुमच्या पदरात आरक्षण टाकेल. मला अटक केले तर आंदोलन करायचे मात्र, तर आंदोलन शांततेत करा. सात-आठ दिवस शांत रहा व शांततेने सर्व बघत रहा असे जरांगे पाटील म्हणाले.

तुझ्यात किती दम आहे तो बघायचाय; मनोज जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर ‘वार’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज