Video : पुणे, नाशिक अन् छत्रपती संभाजीनगर विभागात मोठी कारवाई होणार; तुकाराम मुंढेंनी दिली धक्कादायक माहिती
सर्व जिल्ह्यातील तपास आम्ही हाती घेतला आहे अशी माहिती अन्न व प्रशासन विभाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या भेसळ करणाऱ्या लोकांवर जी कारवाई होत आहे त्यामध्ये व्यावसाय करणारा असो, शेतकरी असो, वितरक असो, उत्पादक असो, कलेक्शन करणारा असो अशा सर्वांवर कारवाई होत आहे. याचा तपास सुरू आहे. यामध्ये आम्हाला काही गोष्टी मिळालेल्या आहेत. पुणे विभागातील, नाशिक विभागातील आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील तपास आम्ही हाती घेतला आहे अशी माहिती अन्न व प्रशासन विभाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भेसळीच्या या जाळ्यात फक्त व्यावसायीकच नाहीत तर शेतकरीही आहेत. जे स्वत: दूथ अशा पद्धतीने तयार करतो. तो दुसळ्या संकलन केंद्राला देतो. त्यामुळं शेतकऱ्याकंड आता जनावर आहेत का हे सुद्धा पाहणार आहोत असंही तुकाराम मुंढे म्हणाले आहेत. त्यामुळं येत्या काळात ही कारवाई फक्त शरहरातील हॉटेल रेस्टॉरंट, दुकाण इतकीच राहणार नाही तर ती शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे असंही मुंढे म्हणाले आहेत.