Download App

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, तरी कामकाज इंग्रजीत का? विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक

Maharashtra Assembly Session 2025 : इंग्रजी कामकाज पत्रिकेवरून सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) आक्षेप घेतला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तरी कामकाज इंग्रजीमध्ये का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. इंग्रजी हवी असणाऱ्यांना व्हिसा काढून अमेरिकेला पाठवा, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. विधानसभेमध्ये मुनगंटीवार (Maharashtra Assembly Session 2025) आक्रमक झाले होते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र विधानसभा नियमांत तरतूद नक्कीच आहे. मी देखील 95 पासून आहे. साधारण कार्यक्रम पत्रिका इंग्रजीत मी तरी बघितली नाही. ऐकून तर घ्या. पहिल्यापासून आहे म्हणजे? (Politics) आपण सनदी अधिकाऱ्यांना मराठी शिकवायला लावतो. इकडे मराठी अभिजात भाषा करायची अन् मराठी ज्यांना बोलता येत नाही, त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी वापरायला सांगायची. मग हिंदीमध्ये बोलावं.ट

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ आषाढी एकादशीला होणार निर्णय

कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी. हिंदीच्या सक्तीला विरोध करायचा आणि इंग्रजीवर प्रेम दाखवायचं. इंग्रजीला आलिंगन द्यायचं. माझा आक्षेप आहे , असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी नियमावलीतून इंग्रजी शब्द काढून टाकण्याची मागणी केली. महाराष्ट्र विधानसभा नियम तयार करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल. माझी विनंती आहे. एकदा नियम समितीची बैठक घ्यावी अन् इंग्रजी शब्द जिथे जिथे असेल तो तिथून काढून टाका. मराठी शिकलीच पाहिजे. अभिजात भाषा आहे. समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी. पण फारच इंग्रजी समजत नसेल तर पासपोर्ट-व्हिसा काढून अशांना थेट ब्रिटनच्या संसदेत पाठवा. ही काय पद्धत आहे? अशा शब्दांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप नोंदवला आहे.

निवडणुकीत नेमकं कुठं चुकलं, भाजप-काँग्रेसचं साटंलोटं काय? बच्चू कडूंनी सांगितली खरी गोष्ट..

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपावर मिश्किल टिप्पणी केली आहे. नार्वेकरांनी म्हटलंय की, सुधीरभाऊ माध्यमांना हिंदी अन् मराठीबद्दल लिहायला खूप काही आहे. आता तुम्ही त्यामध्ये इंग्रजीची भर घालू नका. नार्वेकरांनी असं म्हणताच सभागृहात हशा पिकला. नियम 22 नुसार सभागृहात कोणत्या भाषेमध्ये चर्चा करता येते हे सगळ्यांना माहिती असल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय. तर आपण सुरुवातीपासूनच इंग्रजी आणि मराठीच कामकाज पत्रिका तयार करतो. त्या

शिवाय कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये देण्यात यावी अशी 9 सदस्यांची विनंतीही आली, असं उत्तर राहुल नार्वेकरांनी दिलंय.

follow us