Download App

कर्तृत्वाचा उत्सव, महाराष्ट्राच्या प्रगतीला सलाम! बीकेसी ग्राउंडवर होणार ‘सन्मान महाराष्ट्राचा 2025’

'Sanman Maharashtracha 2025' हा दैदिप्यमान पुरस्कार सोहळा 31 मे रोजी वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर संपन्न होणार आहे.

‘Sanman Maharashtracha 2025’ to be held at BKC Ground : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, क्रीडा, कला, साहित्य, विज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा 2025’ हा दैदिप्यमान पुरस्कार सोहळा 31 मे रोजी वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर संपन्न होणार आहे. अभिनेता, लेखक, वक्ता शरद पोंक्षे यांनी या सोहळ्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

लाखांचा टप्पा सोडा महिलांना भुरळ पाडणारं ‘सोनं’ होणार स्वस्त; मिळणार 55 हजार प्रतितोळा?

संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता प्राप्त ‘अर्थ’ या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित हा पुरस्कार सोहळा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांतील 12 कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षीसुद्धा अशा व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे ज्यांचे कार्य प्रभावी आणि उल्लेखनीय असले तरी प्रसिद्धीझोतात आलेले नाही.

Pune News : गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार, अमित गोरखे

यंदाच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन शरद पोंक्षे यांच्यासह छोटया पडद्यावरील हरहुन्नरी कलाकार गौरव मोरे करणार असून, पुरस्कार वितरणासह संगीत-नृत्याने नटलेले भव्य सादरीकरणही होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि उज्वल भविष्य यांचा संगम असणार आहे. हा सोहळा सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

Waqf Board Bill : वक्फ बोर्ड विधेयकाला लोकसभेत बहुमत पण राज्यसभेत गणित कसं?

गेल्या दोन वर्षांमध्ये या सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला असून, यापूर्वी पद्मश्री दादा इदाते (सामाजिक), पद्मश्री गिरीश प्रभुणे (शैक्षणिक), पद्मश्री राहीबाई पोपेरे (कृषी), श्री प्रवीण दीक्षित (मा.पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य), महेश झगडे (आरोग्य), डॉ. पंकज चतुर्वेदी (आरोग्य), श्री इंद्रनील चितळे (चितळे बंधू), महेश कोठारे, आकाश ठोसर, दिग्पाल लांजेकर (सांस्कृतिक आणि मनोरंजन) यांसारख्या मान्यवरांना या मंचावर गौरवण्यात आले आहे.

पुरुषांच्या मदतीला धावल्या तृप्ती देसाई! राज्यातील महिलांची गुन्हेगारी पाहता पुरुष हक्क आयोगाची केली मागणी

‘सन्मान महाराष्ट्राचा 2025’ हा सोहळा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाचा सोहळा असणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा सन्मान करणारा भव्य दिव्य दिमाखदार सोहळा उपस्थित राहून अनुभवण्यासाठी आपली जागा 8496984969 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करून आरक्षित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

follow us

संबंधित बातम्या