पुरुषांच्या मदतीला धावल्या तृप्ती देसाई! राज्यातील महिलांची गुन्हेगारी पाहता पुरुष हक्क आयोगाची केली मागणी

Trupti Desai Demanded a men’s rights commission due to womens crime in state : गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांकडून पुरूषांचा छळ कींवा खून या प्रकारच्या घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या पुरूषांच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्या म्हणाल्या की, सध्या राज्यात ज्या पद्धतीने महिलांकडून क्रूर हत्येचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ते पाहता पुरुषांना न्याय व अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाची ही स्थापना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.
कीर्तनात तल्लीन झाले प्रवीण तरडे; ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर लावली हजेरी
पुरुष आणि महिला दोघांनाही समान न्याय असला तरी पूर्वी महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली होती. मात्र अलीकडे महिला ज्या पद्धतीने वागत आहेत ते पाहता पुरुषांकडून होत असलेल्या पुरुष हक्क आयोगाचीही निर्मिती करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. नुसत्या समुपदेशनाने भागणार नसून महिलांनाही आपण काय वागतो याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.
परवडत नसल्यास ससूनला जा; डॉक्टरांच्या सल्ल्याच्या धसक्याने गर्भवतीने मृत्यू, पीडित नातेवाईकांचा आरोप
पुरुष हक्क आयोग स्थापन झाल्यास पुरुषांनाही न्याय व अधिकार मिळतील असा दावा त्यांनी केला आहे.सध्या राज्यातील महिला अनेक कर्तुत्वाची कामे करीत असल्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिलाच विराजमान व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या राज्यात भाजपचे पाच वर्ष सरकार राहणार असून जर मुख्यमंत्री बदलाची वेळ आल्यास भाजपने महिलांना संधी द्यावी. असे त्यांनी सांगितले.
जिन्नांला जितकी मुसलमानांची काळजी नव्हती तितकी भाजपला, संजय राऊतांचा हल्लाबोल
याबाबत पंकजा मुंडे या आक्रमक चेहरा असून त्यांना मुख्यमंत्री केल्यास आमची काहीच हरकत असणार नसल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. सध्या राज्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून वाढलेली गुन्हेगारी संतोष देशमुख यांच्यासारखी प्रकरणे पाहता महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त करावे आणि यासाठी राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.