Chandrakant Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) जगात भारताचं स्थान निर्माण केलं, तरीही देशाला युनोचं सदस्यत्व मिळालं नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास मोदी नवी युनो (UNO) स्थापन करतील. मोदींनी कोविड दरम्यान 60 देशांना लस आणि अन्नधान्य देऊन मदत केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली हे ६० देश नव्या युनोचे सदस्य होण्यासाठी सज्ज असतील, असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) केलं.
भारताला युनोचे सदस्यत्व मिळाल नाही तर मोदी नवी UNO निर्माण करतील; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
काल डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शाहु छत्रपती, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, आपल्या देशाची पंरपरा किती थोर आहे, हे तरुणांच्या मनात रुजवणे आवश्यक आहे. तरुणांच्या मनात परंपरा नसल्याचा न्यूनगंड निर्माण केला आहे. पण, आज जग वापरत असलेल्या गोष्टी आपल्याकडे आधीच उपलब्ध होत्या. याची शास्त्रीय पध्दतीने माहिती देण्यात येणार आहे. शुन्य साली भारताचा व्यापार ३२ टक्के होता. इंग्रजांनी देश लुटला तेव्हा तो तीन टक्के झाला. इंग्रज भारतात आले ते जहाजे देखील भारतीय बनावटीचे होते. या सर्वांचा अभ्यास सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, आपल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात तीन हजार वर्षे पुराणांची आहेत. मात्र, पुराण झाले की नाही, याबाबत आपली शंका असते. राम होते की नाही, याबाबतही आपली एक श्रध्दा असते. मात्र, राम आमचा मुळपुरूष आहे, असा विश्वास असतो, तरीही आपण राम होते की, नाही, असं म्हणतो.
काही दिवसांपूर्वी महिला आरक्षणाा मुद्दा निकाली निघाला. यावर बोलतांना पाटील म्हणाले की, महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला. मात्र, हे आरक्षण भारतीय परंपरेत होतेच. 1200 मध्ये मुस्लिमांनी आक्रमण केल्यानंतर त्यांनी देशातील मंदिरे आणि महिलांवर लक्ष्य केंद्रित करून आघात केले. त्यावेळी हिंदूंनी आपल्या महिलांना वाचवण्यासाठी तिला दार बंद करून, शेवटच्या खोलीत लपवले. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिला भरपूर शिकवायचे आहे, पायलट व्हायचं. मात्र, हे सर्व करण्यास थोडा उशीर झाला, हे आपल्याला सांगावे लागेल, असं पाटील म्हणाले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभर जेरे यांनी भविष्यकाळातील तांत्रिक क्षेत्रातील आव्हांनाविषयी भाष्य केल. ते म्हणाले, भविष्यात जग ‘गीग’ इकॉनॉमीवर चालेल. त्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी नसेल, कंत्राटी पध्दतीने रोजगार असेल. कौशल्यांतील बदल आणि आणखी अधिक प्रगत कौशल्ये शिकण्यासाठी पुढील काळात दर दहा वर्षांनी तरुण शिक्षणसंस्थेकडे वळणार आहेत, असं ते म्हणाले.