Mahayuti Ministers Lobbying For Guardian Minister Post : राज्यात गेली दोन महिने विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Maharashtra Politics) होती. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. 5 डिसेंबर रोजी (Mahayuti) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तर 15 डिसेंबर रोजी राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. दरम्यान काल हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप देखील जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता राज्याच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाचे (Guardian Minister Post) वेध लागले आहेत. पालकमंत्रिपदासाठी अनेक मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय.
अजित पवार गटाच्या आमदारांत एकमत नाही? भुजबळांनी नाराजी जाहीर, वळसे पाटलांचा वेगळाच सूर
महायुतीच्या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती स्वत:कडे ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे खाते देण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खातं दिलं गेलंय. महायुतीकडून खातेवाटप झाल्यानंतर आता अनेक मंत्र्यांनी पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केलं असल्याचं समोर येतंय.
चारही मंत्र्यांना ‘वजनदार’ खाती; महायुतीमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा आवाज
महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा केलीय, तर अदिती तटकरी देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असल्याची माहिती मिळतेय. आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे होणार की पंकजा मुंडे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्रिपदाची माळ संजय शिरसाट अन् अतुल सावे यांपैकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा असल्याचं दिसतंय. पुढील काळात आता मुंबई महापालिकेच्या देखील निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही मुंबई शहरासह उपनगरातील पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईत पालकमंत्रिपद नेमकं कोणत्या पक्षाला मिळतं, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याचा आगामी निवडणुकांवर देखील मोठा परिणाम होणार आहे.
यंदा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक अनपेक्षित बदल पाहायला मिळाले. मंत्रिमंडळातून तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आलंय. त्यामुळे आता पालकमंत्रिपदासाठी देखील अशीच काही नवीन रणनिती महायुतीचे पक्षश्रेष्ठी वापरणार का? अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे.