Download App

जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार,उच्च स्तरीय चौकशीसाठी फडणवीसांची भेट; पडळकर आक्रमक

BJP MLA Gopichand Padalkar सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीवरून सदाभाऊ खोत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले आहेत

BJP MLA Gopichand Padalkar Meet to Devendra Fadanvis for Sangali DCC Bank Fraud high-level inquiry :सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीवरून रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले आहेत यामध्ये त्यांनी महायुतीमध्येच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी त्यांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या चौकशी सुरू आहे मात्र ही चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर पूर्वी झालेल्या नोकर भरती घोटाळ्याची चौकशी देखील केली जावी.

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये महसूलमंत्री बावनकुळेंची धाड, दुय्यम निबंधक कार्यालयात सापडले पैशांचे बंडल

तसेच राज्य सरकारने नव्याने नोकर भरती करण्याचे जे काही सूचना दिले आहेत ती भरती किंवा आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून केली जावी अशी मागणी आम्ही केली आहे ही मागणी नक्कीच विचारात घेतली जाईल असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशी बाबत माहिती दिली.

follow us