Download App

साईबाबांची ‘झोळी’ सोन्याने भरली ! ठेवायला जागा नाही

शिर्डी संस्थानकडे (Shri Saibaba Sansthan Trust) थोडेथिडके नाहीतर पाचशे किलो सोन्याच्या वस्तू (Official Website) आहेत.

  • Written By: Last Updated:

Shri Saibaba Sansthan Trust Rising Gold : शिर्डीच्या साईबाबांच्या (Shirdi Saibaba) दर्शनाला देशभरातील भाविक येतात. भाविक हे पैशाबरोबर सोनेही (Gold) दान करतात. त्यात सुवर्णमुकुटसह इतर वस्तू असतात. शिर्डी संस्थानकडे (Shri Saibaba Sansthan Trust) थोडेथिडके नाहीतर पाचशे किलो सोन्याच्या वस्तू आहेत. नव्याने दान होणाऱ्या सोन्याच्या वस्तू ठेवण्यासाठी आता संस्थानला नवी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. परंतु नुसतेच सोने ठेवून, त्यापासून संस्थानला उत्पन्न मिळत नाहीत. सोने वितळून त्यापासून नाणे बनविण्यात आले. पण त्या नाण्याचे काय झाले. सोन्याच्या विटा तयार करून त्या बँकेत ठेवून त्यापासून व्याज मिळविता येईल का ? हे पाहुया….


निष्ठावंतांना मानाचं पान! नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी भालसिंग तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर

शिर्डी साई संस्थानकडे सध्याच्या घडीला पाचशे किलो सोन्याचे दागिने, आठ हजार किलो चांदीच्या वस्तू आहेत. सोने, चांदीचा भाव वाढल्याने साई संस्थानच्या संपत्तीत अडिचशे कोटींचा वाढ झाली आहे. परंतु या वस्तू ठेवण्यासाठी साई संस्थानच्या स्टॉंग रुमची जागा कमी पडत आहे. संस्थानकडे असलेल्या सोने वितळून त्यापासून नाणे बनविण्याचा निर्णय साई संस्थानने काही वर्षांपूर्वी घेतला होता. 140 किलो सोने वितळून त्यापासून शुद्ध सोन्याचे नाणे बनविण्याचा निर्णय घेतला. हे नाणे भाविकांना विकत घेता येणार होते. 2008, 2009, 2012 या साली तीनदा नाणे बनविण्यात आले. अडीच, पाच, साडेसात आणि दहा ग्रॅममध्ये हे नाणे बनविण्यात आले होते.

जगतापांना भिडणारे शत्रुघ्न काटे पिंपरी-चिंचवडचे नवे शहराध्यक्ष; मनपा निवडणुकीत चमत्कार करणार?

2012 मध्ये 37 किलो शुद्ध सोने तयार केले आहे. त्यापासून अडीच, पाच, साडेसात, साडेसात, दहा ग्रॅमचे नाणे तयार केले आहे. साई संस्थानकडे आता साडेचार किलोचे नाणे शिल्लक आहे. म्हणजेच वर्षातून एक दीड किलो सोन्याचे नाणे विकले जात आहे. 140 किलो सोन्याचे दागिने विकण्यासाठी किती वर्ष लागतील हा प्रश्न आहे.

नाणे तयार करून विकणे हा पर्याय व्यवहार्य नाही म्हणून त्याविरोधात अॅड. संदीप कुलकर्णी हे उच्च न्यायालयात गेले आहेत. नाणे तयार करण्याएेवजी चांदी व सोन्याच्या वस्तू सरकारी टाकसाळीमध्ये वितळाव्यात त्यापासून तयार झालेल्या विटा, बार सरकारच्या सुवर्ण धनीकरण योजनेत ठेवावी. सोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील बुलियन शाखेमध्ये ठेवले तर त्यापासून वर्षाला अडीच टक्के व्याज येईल. तसेच संस्थेचे सोनेही सुरक्षित राहिल, अशी याचिका कुलकर्णी यांची आहे. या याचिकेवर येत्या 25 जून रोजी छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट खंडपीठात यावर सुनावणी होणार आहे.

follow us