Download App

निष्ठावंतांना मानाचं पान! नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी भालसिंग तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर

Ahilyanagar BJP : भारतीय जनता पार्टीच्या नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर झाले असून अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दक्षिणमध्ये दुसऱ्यांदा दिलीप भालसिंग यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांचे नाव जाहीर झाले आहे. तसेच राज्यातील 58 नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांची नावे प्रदेश निवडणूक अधिकारी चेनसुख संचेती यांनी जाहीर केले आहेत.

भाजपचे नगर शहराध्यक्ष, दक्षिण व उत्तर असे तीन जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षाने निवडणुकीसाठी नियुक्त केलेले पर्यवेक्षक तथा मंत्री जयकुमार रावल, निरीक्षक लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप व आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये 27 एप्रिलला इच्छुकांची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून कल जाणून घेण्यात आले होते. पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली शिफारस पत्रे बंद पाकिटातून प्रदेश निवडणूक समितीकडे पोहोच करण्यात आली.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निवडी आज जाहीर झाल्या आहेत. नुकतेच पक्षाच्यावतीने राज्यातील 58 नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. याबाबतची माहिती प्रदेश निवडणूक अधिकारी चेनसुख संचेती यांनी दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण व उत्तरेचे जिल्हाध्यक्ष यांची नावे जाहीर झाली आहे. दिलीप भालसिंग यांची दक्षिण तर नितीन दिनकर उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

पुणे भाजपचे पुन्हा धीरज घाटेच कारभारी.. बिडकर, भिमालेंच्या पदरी निराशा…

राज्यात येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहे. दरम्यान इच्छुकांना निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातूनच गेल्या अनेक दिवस या निवडी प्रलंबित राहिल्या होत्या. उत्तर जिल्हाध्यक्ष पदावर विखे समर्थकच असावा अशी चर्चा होती. मात्र नगर शहराध्यक्ष व दक्षिण जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यातून रस्सीखेच तीव्र होती. अखेर दिलीप भालसिंग व नितीन दिनकर यांची नावे जिल्हाध्यक्षपदी जाहीर झाली आहे. मात्र अद्याप नगर शहराध्यक्ष यांचे नावे घोषित झाले नाही.

भालसिंग दुसऱ्यांदा दक्षिण जिल्हाध्यक्ष

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नगर तालुक्यातील वाळकी येथील दिलीप भालसिंग यांच्यावर दुसऱ्यांदा दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भालसिंग हे सन 1990 पासून संघ आणि भाजपात कार्यरत आहेत. गावातील शाखाप्रमुख ते दक्षिण जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. या प्रवासात त्यांनी ३ वेळा भाजपाचे तालुकाध्यक्षपद सांभाळले आहे. संघटन पातळीवर विविध पदांवर काम करताना त्यांनी वाळकी या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच पदावर काम केले तर सलग 2 वेळा ते नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी होऊन संचालक झाले होते.

नितीन दिनकर यांचा परिचय

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे सर्वसामान्य कुटुंबातील नितीन दिनकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हा चिटणीस, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे बुथ प्रमुख ते तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक असणारे दिनकर यांना आता पक्षाने थेट उत्तर जिल्हाध्यक्षपदी विराजमान केले आहे.

भाजपकडून ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या; मात्र, बीड वर्धा चंद्रपूर अन् ‘या’ जिल्ह्यांत निवडीला अपयश

follow us