पुणे भाजपचे पुन्हा धीरज घाटेच कारभारी.. बिडकर, भिमालेंच्या पदरी निराशा…

BJP District Presidents List : प्रदेश भाजपकडून राज्यातील शहर आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश शहर आणि जिल्हाध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र यास पुणे शहर अपवाद ठरला असून विद्यमान शहराध्यक्ष असलेले धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची पुन्हा एकदा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
धीरज घाटे यांच्या नेतृत्वात लोकसभा, विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आगामी महानगरपालिका निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्वात लढवली जावी असा मानस प्रदेश भाजप (BJP) आणि स्थानिक नेत्यांनी असावा यामुळे घाटे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे. पुणे शहराध्यक्ष पदासाठी पुणे भाजपमधील गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले हे आगरी होते मात्र बिडकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारल्याने भीमाले आणि बिडकर यांच्या पदरी निराशा पडली आहे.
भाजप शहराध्यक्ष बदलला जाईल आणि नवीन शहराध्यक्ष मिळेल असे अनेकांना वाटत होते. मात्र तसे न होता प्रदेश भाजपने पुण्यामध्ये जैसे थे परिस्थिती ठेवत धक्का दिला आहे. दरम्यान, धीरज घाटे हे कसबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा हेमंत रासने यांना संधी दिल्याने घाटे नाराज होते मात्र त्यांची समजूत काढत पक्ष नेतृत्वाने त्यांना त्यावेळीच काही शब्द दिला असावा आणि त्यामुळेच घाटे यांना पुन्हा शहराध्यक्षपदी निवडल आहे.
लेट्सअप मराठीशी’ बोलताना घाटे म्हणाले की मला पुन्हा शहराध्यक्ष म्हणून निवडला जाईल याचा विश्वास नव्हे तर खात्री होती, अशी प्रतिक्रिया घाटे यांनी दिली आहे. घाटे पुढे म्हणाले की, पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास टाकला आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये जे यश संपादन करण्यात आलं त्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा माझ्यावर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची जबाबदारी दिली आहे.
जी. एस.महानगर बँक! सासू सुनेची जोडी निवडणुकीच्या रिंगणात
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत घाटी यांनी व्यक्त केल आहे. दरम्यान, घाटे यांना पुन्हा एकदा संधी दिल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे मात्र भाजपमध्ये नाराजी चालत नाही. पक्ष नेतृत्वाचा ऐकावं लागतं त्यामुळे बिडकर असो किंवा भिमाले यांना पक्ष कुठली संधी आणि जबाबदारी देणार याची त्यांना सध्या तरी वाट पाहावी लागणार आहे.