पुण्यात भाजपच्या गोटात हालचालींना वेग, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रासने धीरज घाटेंच्या भेटीला, काय चर्चा झाली?

पुण्यात भाजपच्या गोटात हालचालींना वेग, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रासने धीरज घाटेंच्या भेटीला, काय चर्चा झाली?

BJP Hemant Rasane Meet Dhiraj Ghate : राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, तर अनेकजण आपला निर्णय बदलत आहेत. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात भाजपच्या (BJP) गोटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हेमंत रासने धीरज घाटेंच्या भेटीला गेले आहेत. आता त्यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा होते? याकडे अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

भावानेच फेटाळला अजितदादांचा दावा, श्रीनिवास पवार म्हणाले… आईला जसा दादा तसाच नातू युगेंद्र

कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपा उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची भेट घेतली आहे. हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धीरज घाटे यांच्या भेटीला गेले आहेत. धीरज घाटे कसब्यातून लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु भाजपने हेमंत रासने यांना संधी दिली. रासने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर घाटे (Dhiraj Ghate) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार का? अशी चर्चा देखील सुरू होती.

शिवाजीराव कर्डिलेंची ताकद वाढली! राजू शेटे पाटलांचा शिंदे गटात प्रवेश अन् पाठिंबाही…

परंतु आज रासने थेट घाटेंच्या भेटीला पोहोचले आहेत. महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र लढण्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. आज भाजपने उमेदवारांच्या नावाची चौथी अधिकृत यादी देखील जाहीर केलेली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून इच्छुकांची मोठी रांग लागली होती. त्यानंतर रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर फेसबुक आणि एक्सवर पोस्ट लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवं आहे, परंतु 30 वर्ष हिंदुत्वासाठी कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय..‌ असं घाटे यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमधे म्हटलं होतं. धीरज घाटे कसबा पेठ मतदारसंघातुन इच्छुक होते. परंतु भाजपने पुन्हा हेमंत रासने यांनाच उमेदवारी दिली. मी प्रक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी यापूर्वी चारवेळा इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांनी मला संधी दिली नाही. त्यामुळे मी इतर कोणावर नाही तर पक्षश्रेष्ठींवर नाराज आहे, असं घाटे म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube