भावानेच फेटाळला अजितदादांचा दावा, श्रीनिवास पवार म्हणाले… आईला जसा दादा तसाच नातू युगेंद्र

भावानेच फेटाळला अजितदादांचा दावा, श्रीनिवास पवार म्हणाले… आईला जसा दादा तसाच नातू युगेंद्र

Shrinivas Pawar Reaction On Ajit Pawar : बारामतीत (Baramati) पवार विरूद्ध पवार या अंकाचा पुढील भाग सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. प्रचाराच्या पहिल्याच सभेमध्ये अजित पवार भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. ते (Ajit Pawar) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माझ्या घरातला उमेदवार म्हणजे पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलं होतं. ही चूक केली होती. परंतु हीच चूक तुम्ही म्हणजेच शरद पवार आणि युगेंद्र पवार का करत आहे? असा प्रश्न केला. पुढे ते म्हणाले की, माझी आई म्हणतेय की युगेंद्र पवार यांना उभं करू नका, तरीही त्यांना का उभं केलं जातंय असं म्हणत त्यांनी भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केलाय. यावर युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

शक्तिप्रदर्शन नव्हे, महाविजयाची पूर्वतयारी; चिंचवडमध्ये शंकर जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज

अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, आईंनी असं काही भाष्य केलेलं नाही. आईला दादा आणि युगेंद्र दोन्ही सारखेच आहे. ती राजकारणावर जास्त काही बोलत (Assembly Election) नाही. अजित पवार आता म्हणत आहे की चूक केली. परंतु मी तेव्हा पोटतिडकीने सांगत होतो की, दादा असं नको करू. ती आपली लहान बहीण आहे. तीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांचं एकच वाक्य होतं की, माझं ठरलंय. मी राजकारणाच्या कधीच भानगडीत नाही पडलो. पण यावरून असं वाटलं की, शरद पवार यांना खूप एकटं पाडलंय. मला ते नाही आवडलं, म्हणून मी आलो.

अजित पवारांनी आईवरून केलेल्या विधानाचा श्रीनिवास पवार यांनी पाठपुरावा केला नाही. युगेंद्रने जेव्हा त्याच्या आजीला याबद्दल सांगितलं, तेव्हा ती म्हणाली की, जे तुला योग्य वाटतं ते कर. साहेबांवर घातलेला घाव अतिशय कडक होता. घाव भरून निघेल, पण व्रण राहतील. युगेंद्र पवार साहेबांना फॉलो करतात. साहेबांची देखील काही बारामतीसाठी गणितं असतील. दादाचे विचार भाजपचे विचार आहेत. साहेबांना बारामती खूप महत्वाची आहे. त्यामुळे बारामतीच्या विकासासाठी त्यांनी स्वत:चा उमेदवार दिलाय.

भाजपला मुंबईत मोठा झटका; बोरिवलीत गोपाळ शेट्टींची बंडखोरी, शिंदेंचा नेताही अपक्ष लढण्याच्या तयारीत

तीन चार महिन्यांपूर्वी दादा नकला करत होता. आता दादावर ती वेळ आलीय. शब्द जपून वापरायला हवे, असं सांगितल्यानंतर आता दादा वाचून भाषणं करायला लागला आहे. युगेंद्रचं राजकारणात पहिलं पाऊल आहे. त्याच्यामागे स्वत: शरद पवार आहेत. लोक साहेबांकडे बघून मतदान करणार. शरद पवार यांना सरकार बदलायचं आहे. कौटुंबिक परतीचे मार्ग बंद होत नाही. भेटीगाठी होतात, बोलणं देखील होत. त्याच्यात काही फरक झालेला नाही. अजूनतरी नाती बदलली नाही.

राजकारणात शरद पवार यांच्या विरोधकांना अपेक्षित होतं, त्याच्यात यश मिळालं पाहिजे. पवार कुटुंब फुटलं पाहिजे यात भाजपला यश मिळालं. लोकसभेला सुप्रिया सुळेंना मताधिक्य होतं. परंतु अनेक वर्षांपासून अजित पवारांचं काम आहे. बारामतीकरांना विकासाची डार्क साईट पटत नाही. बारामतीकरांना काय चांगलं आणि काय वाईट? याबद्दल माहिती आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होणार आहे. त्यामुळे आश्वस्त असल्याचं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube