‘हिंदुत्ववादी सरकार हवंय मग 30 वर्ष हिंदुत्वासाठी लढणारा कार्यकर्ता का नको?’ नाराज धीरज घाटेंचा भाजपला सवाल

  • Written By: Published:
‘हिंदुत्ववादी सरकार हवंय मग 30 वर्ष हिंदुत्वासाठी लढणारा कार्यकर्ता का नको?’ नाराज धीरज घाटेंचा भाजपला सवाल

Dheeraj Ghate : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) भाजपने (BJP) आज दुसरी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने पुण्यातील तीन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ (Kasaba Peth) मतदारसंघातून हेमंत रासनेंना (Hemant Rasane) मैदानात उरवलं. रासनेंना उमेदवारी जाहीर होताच भाजपमधील नाराजी नाट्य समोर आलंय. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी (Dheeraj Ghate) नाराजी व्यक्त केली.

पानचिंचोली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले स्वागत 

तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून का नकोय, असा घाटे यांनी भाजप नेतृत्वाला सवाल केला आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अनेक इच्छुकांची रांग लागली होती. यामध्ये मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक, दिवंगत गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट किंवा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यापैकी एकाला संधी मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र पुण्यात भाजपने सर्व आमदार पुन्हा रिपीट केले.

मोठी बातमी! ठाकरे गटाचा दहिसरमध्ये उमेदवार ठरला, तेजस्वी घोसाळकरांनी घेतला एबी फॉर्म…. 

कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्यात आली. कसब्यातूनही पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, नाराज धीरज घाटेंनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिलं की, तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून का नकोय?  असा सवाल भाजप नेतृत्वाला केला.

कसबा पोटनिवडणुकीतही रासनेंना उमेदवारी..
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. तर कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. कसब्यातून धंगेकरांनी रासनेंचा पराभव केला होता. आता त्याच जागेवर भाजपने रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर घाटेंनी फेसबुकवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केल्यानं भाजपमधील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube