पानचिंचोली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले स्वागत

  • Written By: Published:
पानचिंचोली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले स्वागत

Sambhajirao Patil Nilangekar : कारखान्याचे माजी संचालक, बाजार समिती संचालक, उपसरपंच तसेच काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपा नेते, माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश घेतला.

आमदार निलंगेकर यांनी या सर्वांचे स्वागत केले. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील लोकमान्य संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, निलंगा बाजार समितीचे माजी संचालक बालाजी पाटील, बप्पा धामनगावे, माजी उपसरपंच गोविंद दिवे व सत्यप्रकाश होळीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव व सिद्धेश्वर भाडेकरी, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास पाटील, रमेश जाधव, लक्ष्मण बंडगर, साहेबराव पाटील, चंद्रकांत जाधव, पैगंबर शेख, सतिश जाधव, मुकिंद काळे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी प्रताप हनमंते, वामन हनमंते, सिद्धेश्वर जाधव, गोविंद भदरगे, राम तल्लेवाड, राम जाधव, बाळाजी दिवे, सुधाकर राठोड, अनिल चव्हाण, पिराजी चव्हाण, बाळू पवार, परमेश्वर चव्हाण, सुनील चव्हाण, लक्ष्मण पवार, लहू जाधव, नेताजी पाटील, सिद्धेश्वर काळे, ऋषिकेश बेळंबे, महेश जाधव, राम जाधव, विष्णू जाधव, ऋषिकेश हनमंते, बळीराम माळी, हभप सुनील बेळंबे, हभप तातेराव धामणगावे महाराज, वैभव दिवे, गैबी मुजावर, विलास साळुंके, सखाराम हनमंते, मुबीन  महताब मुजावर, योगेश गंगथडे, ज्योतीराम बनसोडे, दिनकर हनमंते, सोनेराव जाधव, शाम जाधव, दिग्विजय हनमंते, राम चौधरी, लिंबराज जाधव, राजकुमार जाधव, रवी जाधव, गहिनीनाथ पाटसकर, पवन भोसले, विश्वनाथ जोगी, शैलेश जाधव, राम सूर्यवंशी, पवन काळे व अमोल जाधव आदींचा प्रवेश घेणाऱ्यामध्ये समावेश आहे.

भाजपाची विकासाची धोरणे आणि मतदारसंघाचा होणारा विकास पाहता आम्ही भाजपात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करत विकासाची गती कायम राखण्यासाठी आम्ही काम करू,असेही पदाधिकारी म्हणाले.

महायुती आल्यावर तुळजाभवानी मंदिरासाठी 1300 कोटींचा निधी, राणाजगजितसिंहने मांडला लेखाजोखा

आ.निलंगेकर यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे भाजपात स्वागत केले. शनिवारीच काँग्रेस कडून पानचिंचोलीचे रहिवासी अभय साळुंके यांना निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित झाली. त्याच दिवशी या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेतला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube