महायुती आल्यावर तुळजाभवानी मंदिरासाठी 1300 कोटींचा निधी, राणाजगजितसिंहने मांडला लेखाजोखा

  • Written By: Published:
महायुती आल्यावर तुळजाभवानी मंदिरासाठी 1300 कोटींचा निधी, राणाजगजितसिंहने मांडला लेखाजोखा

Ranajagjitsinha Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) उमेदवारांचे नावे जाहीर करण्याचे काम सुरु आहे. यावेळी देखील भाजपकडून (BJP) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर (Tuljapur) विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. आज आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेऊन तुळजापूरसह जिल्हयातील महत्वाच्या मुद्यावर संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, गेल्या पाच वर्ष मतदारसंघात अनेक विकासाचे कामे पूर्ण झाले असून अनेक विकासाचे काम मतदारसंघात सुरु आहे. तसेच येणाऱ्या पाच वर्षात मतदारसंघात काय काय करायचे आहे याचा आराखडा तयार करत आला आहे असं पत्रकार परिषदेमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

आपल्या मतदारसंघासाठी गेल्या पाच वर्षात महायुती सरकारने भरपूर निधी दिला आहे तसेच अशक्य वाटणारे प्रोजेक्टला देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक प्रोजेक्टचे कामे मतदारसंघात सुरु झाले आहे त्यासाठी मी महायुती सरकारचं आभार मानतो असं देखील ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, मतदारसंघासह जिल्ह्यात पाणीचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी डॉक्टर साहेबांनी प्रचंड काम केले आहे. त्यामुळे पाऊस पडला तर आपल्याला पाणी उपल्बध होते आणि जेव्हा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असते त्यासाठी देखील डॉक्टर साहेबांनी काम केले आहे. 2001 मध्ये त्यांनी याबाबत तत्कालीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता आणि या प्रोजेक्टसाठी मंजुरी मिळवून घेतली होती तर 2023 साठी या प्रोजेक्टच्या अंतिम टप्प्यासाठी महायुती सरकारने 11 हजार 700 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली आहे आणि प्रोजेक्टचा काम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

तसेच तांबेवाडीला 370 एकरमध्ये नवीन एमआयडीसी (MIDC) मंजूर करण्यात आली आहे आणि त्याचा भुसंपादन देखील सुरू झाला आहे आणि एमआयडीसी मध्ये तब्बल 12-13  हजार लोकांना रोजगार मिळणार असं देखील ते यावेळी म्हणाले.

IND vs NZ : टीम इंडियाला धक्का अन् न्यूझीलंडने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

ठाकरे सरकार असताना आपण आई तुळजाभवानी मंदिरासाठी निधीची मागणी करत होतो मात्र त्यांनी निधी दिला नाही. मी त्यांना विनंती केली की तुम्ही फक्त प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवा मात्र त्यांनी पाठवला नाही असा खुलासा देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तसेच महायुती सरकार आल्यावर आई तुळजाभवानी मंदिरासाठी तब्बल 1300 कोटी रुपयांच्या प्रोजेक्टला मंजुरी दिली असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube