मेडिकल कॉलेजबाबतचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडेल, आमदार राणांचं ओमराजेंना आव्हान

मेडिकल कॉलेजबाबतचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडेल, आमदार राणांचं ओमराजेंना आव्हान

Ranajagjitsinha Patil : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. येथे राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्जना पाटील महायुतीकडून मैदानात आहेत. तर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Dharashiv LokSabha) हे पुन्हा एकाद शिवसेने उबाठाकडून लोकसभेच्या मैदानात आहेत. आज भाजप आमदार राणाजगजितसिंह राणा यांनी पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) संधी मिळूनही काही काम केलं नाही. (Arjana Patil) कायम खोट बोलण, नौटंकी करण, बोलबच्चनगिरी करणं हेच यांच काम आहे असा आरोपही राणा यांनी यावेळी केला. त्यामुळे लकांनी आता आपली काम कोण करू शकतो हे ओळखून यावेळी मतदान करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

हा प्रचंड खोटारडा माणूस आहे 

धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर ते दुसरीकडे नेलं हा आरोप विरोधी उमेदवाराकडून केला जातो. मात्र, हे मेडिकल दुसरीकडं नेलं हा आरोप करताना त्याचे पुरावे द्या. जर पुरावे दिले तर मी राजकारण सोडून देईल असं थेट आव्हान राणाजगजितसिंह पाटील यांनी नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना दिलं आहे. तसंच, हा प्रचंड खोटारडा माणूस आहे असा आरोपही राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केला.

 

आपल्या वाट्याचा निधी दिला नाही

आपला विरोधक असं म्हणत ओमराजे यांचा राणा यांनी बाळ असा उल्लेख केला. तसंच, ओमराजे निंबाळकरांनी मागच्या पाच वर्षात काही काम केलं असेल तर लेखी द्याव असं आव्हानही राणा यांनी यावेळी दिलं. तसंच, काही काळापूर्वी यांनी सांगितलं की मी तुळजापुरला रेल्वे आणणार आहे. मात्र, भूमिपुजन झालं. त्यामध्ये अर्धे पैसे केंद्र सरकारचे आणि अर्धे पैसै राज्य सरकारचे असं ठरलं होतं. परंतु, ठाकरे सरकार आलं. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्य सरकारच्या वाट्याचा एक रुपायाही दिला नाही असा थेट आरोप राणा यांनी केला. आणि हा निधी मिळवण्यासाठी ओमराजे यांनी काय प्रयत्न केले हे सांगाव असंही राणा यावेळी म्हणाले.

 

पत्र देऊन अडथळा आणला
आपण काय बोललो. इथ बोललो हे सांगू नका. काय काम केलं हे सांगा. तुमच्या पाच वर्षात काय काम झालं हे दाखवा. जे काही बोलायचं ते खर बोलायचं. नखरे करू नका ते आता सहन केले जाणार नाहीत असा थेट इशाराच राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी ओमराजे निंबाळकर यांना दिला आहे. दरम्यान, रेल्वे भुसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. प्रशासनाशी चर्चा चालूच होती. परंतु काही लोकांनी एक पत्र देऊन काही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पंरतु, जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये लवाद म्हणून नेमलं आहे. त्यामुळे या भुसंपादनात सर्व शेतकऱ्यांना योग्य तो मावेजा मिळेल असं आश्वासन राणा यांनी यावेळी दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज