Video : माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना…ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ‘मनातली’ गोष्ट

Video : माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना…ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ‘मनातली’ गोष्ट

Omraje Nimbalkar Exclusive :ठाकरे गटातील अनेक माजी खासदार, माजी आमदार शिंदे गटात गेले आहेत. आता विद्यमान लोकांना ऑफर आहे की नाही असं विचारलं असता, ओमराजे म्हणाले मी मागच्यावेळी खासदार होतो तेव्हा, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. जर मला पैसेच कमवायचे असते तर आमच्या भागाचा (Nimbalkar) विकास करायचा आहे असं म्हणून मी गेलो असतो तेव्हाच त्यांच्या गटात. मात्र, माझा उद्देश तो नाही. माझ्या गरजा फार कमी आहेत. तसंच, त्यामध्ये मी समाधानी आहे. त्यामुळं अस काही करण्याचा प्रश्नच नाही अस म्हणून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतर करण्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला. ते लेट्सअप मराठीवर खासदारांचे रिपोर्ट कार्ड या खास कार्यक्रमात बोलत होते.

खासदारकीला चांगली मत पडलेल्या तुमच्या धाराशिव मतदारसंघात विधानसभेला असं काय घडलं ज्यामध्ये विधानसभेला फटका बसला असं विचारलं असता ओमराजे म्हणाले, माझा मतदारसंघ याला अपवाद आहे. सहा विधानसभांपैकी आम्ही चार जागा लढत होतो. त्यामध्ये आमची एक गेली. धाराशिव, उमरगा, बार्शी या जिंकलो तर अवसा काही मताने जागा गेली असं ओमराजे म्हणाले. बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढत होते. पण लोकांची काही गणित असतात ते आपल्या लक्षात येत नाहीत असंही ते म्हणाले. मी आणि तान्हाजी सावंत सोबतच काम करत होतो. मात्र, ते शिंदे गटात गेल्यानंतर आमचे मार्ग वेगळे झाले असंही ते म्हणाले.

Video : गेल्या सहा वर्षात धाराशिव जिल्ह्यात आपण काय केल?, खासदार ओमराजेंनी यादीच वाचली

तुम्ही फोन घेणारा खासदार म्हणून तुमची ओळ आहे ती आजही कायम आहे का? यावर बोलताना ओमराजे म्हणाले, पूर्वी संस्था, कारखाना, उद्योग अशा गोष्टी होत्या. आता तो काळ राहिला नाही. त्यामुळे आता रोज आपल्यासाठी कोण उपलब्ध आहे हे पाहतात आणि त्यावर आपली किंमत करतात असं ओमराजे म्हणाले आहेत. त्याचबरोबर, जर मी लोकांचा वेळोवेळी फोन घेत नसेल तर तुमच्याकडं जो सर्वे झाला त्यामध्ये मला कसे इतके मत पडली असती असं म्हणत त्यांनी आपल्याला लोकांचा आजही तिककाच पाठिंबा आहे असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी ओमराजे यांनी मराठी-हिंदी भाषेच्या वादावरही भाष्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले, ज्या भागात जी भाषा आहे त्या भागात अनेक विभागांचे प्रमुख त्या त्या भाषेचे असावेत. तसंच, बँक मॅनेजर दुसऱ्या भाषेतला असला तर त्याची अडच होते. त्यांमुळ त्या त्या भाषेतली लोक त्या त्या बँकेत असावीत असं म्हणत ओमराजे यांनी यावेळी भाषेबद्दलही भाष्य केलं आहे. तसंच, त्यांनी आम्ही वेळोवेळी लोकसभेतही यावर आवाज उठवतो असंही ते म्हाणाले आहेत. कारण, सामान्य लोकांना यामुळं अडचहोत असते असं तो म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube