Video: भोर एमआयडीसी प्रकल्पाला विरोध कुणाचा?, आमदार संग्राम थोपटेंचा पुराव्यासह मोठा खुलासा
Sangram Thopte Exclusive on Letsupp Marathi : राजगडचा विषय आजचा नाही. (Sangram Thopte) गेली अनेक दिवसांचा विषय आहे. परंतु, आजही त्यामध्ये खोडा घालण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, अजित पवार आणि तुमच्यात काही खटके उडालेत का? असं विचारलं असता त्यावर थोपटे म्हणाले यामध्ये वैयक्तीक काही नाही. तसंच, मी त्यांचा स्पर्धकही नाही. त्यामुळे माझ्यात आणि त्यांच्या काही खटके उडाले नाहीत अस स्पष्ट मत काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केलं आहे. ते लेट्सअप चर्चेत बोलत होते.
नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा तुम्हाला अध्यक्ष करणार अशी चर्चा होती यावर थोपटे म्हणाले हे खर आहे. की, यामध्ये मला संधी मिळणार होती. परंतु, ती निवडणुकच लागली नाही त्यामुळे हे घडलं नाही. तसंच, त्या ठिकाणी मी कुणाला नको होते हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत त्यामध्ये राजकारण झालं असंही यावेळी सांगितलं आहे.
कायम थांबाव लागतय यावर बोलताना थोपटे म्हणाले, लोक संधी देतायत म्हणून मी काम करतोय. परंतु, मोठी पद मिळाली असती तर आमदार निधीपेक्षा जास्त निधी आणता आला असता. परंतु, तस झालं नाही असंही थोपटे म्हणाले. यावेळी त्यांनी भोर एमआयडीसी प्रकल्पावरही खुलासा केला आहे. त्यावर ते म्हणाले, या विषयावर मी चार बैठका गेतल्या. तसंच, स्थानिक शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे.
मोठी बातमी! इस्त्रायलच्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या सिनवार ठार; पंतप्रधान नेत्यानाहुंची घोषणा
या विषयावर 1992 विषयावर प्रस्ताव आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी गावा गावात जाऊन बैठका घेतल्या. त्यामध्ये 67 टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं समोर आलं. याचं रेकॉर्ड माझ्याकडं आहे. परंतु, याला नक्की विरोध कुणाचा? अनेक ग्रामपंचायत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत असं म्हणत त्यांनी या प्रकल्पाला विरोध म्हणून माझ नाव घेतलं पण विरोध करणाऱ्या लोकांना सांगितलं नाही की विरोध करू नका असंही थोपटे यांनी यावेळी सांगितलं आहे.
निवडणूक आली की संग्राम थोपटे यांनी 5 वर्षात काय केलं असं म्हणणारे विकास कामांना विरोध करतात असा आरोप केला. निवडणूक काळात बाहेरची नेते येते आणि आम्हाला प्रश्न विचारतात. परंतु, आम्ही आव्हान करूनही यांनी काही पावलं उचललेली नाहीत. चाकणमध्ये 85 लाख रुपये हेक्टर रेट होता. तर भोरला मागितला 5 लाख रूपये गुंठा रेट मागितला. असा रेट सरकार कसा देणार? त्यामुळे असा विरोध करून याचं राजकारण हे लोक करतात. मला विचारतात काय केलं. परंतु, मी काय केलं याचं रेकॉर्ड आहे. तुम्ही काय केलं हे सांगा असा प्रश्न उपस्तित करत थोपटेंनी विरोधकांना उत्तर दिली आहेत.