भोरमध्ये राजकीय समीकरणे बदलणार, दादांचा भाजपला धक्का; माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीत डेरेदाखल

Pune Politics :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.

  • Written By: Published:
Pune Politics

Pune Politics :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. पक्षाने पुण्यात ऑपरेशन लोटस सुरु करत मोठमोठे प्रवेश घडून आणले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपकडून आता जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद भोर आणि पुरंदरमध्ये वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फटका बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे मात्र आता अजित पवार यांनी भाजपसह संग्राम थोपटे यांना मोठा धक्का दिला आहे.

संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने नाराज असलेल्या अनेक नगरसेवकांनी आज भाजपला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. यात सर्वात मोठा नाव म्हणजे संग्राम थोपटे यांच्या निकटवर्ती निर्मला आवारे यांचा आहे. निर्मला आवारे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

निर्मला आवारे यांच्या या प्रवेशामुळे भोरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे आता भोरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीकडून आवारे हे नगराध्यक्ष पदासाठी निडणुकींच्या रिंगणात उतरणार असून भाजपने आतापर्यंत नाव जाहीर केलेला नाही. निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भोरमध्ये राजकीय समीकरणे बदली आहे.

खुलासा पत्रामध्ये सगळे पुरावे देणार; पक्षाकडून नोटीस अन् रुपाली ठोंबरे चाकणकरांवर भडकल्या

भोरमध्ये मागील दहा वर्षापासून आवरे यांच्याकडे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पद असून सर्व समावेशक चेहरा अशी आवरे यांची ओळख आहे. या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद भोर शहरांमध्ये वाढली आहे. तर दुसरीकडे आमदार शंकर मांडेकर यांच्यामुळे संग्राम थोपटे यांच्या निकटवर्ती निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची देखील चर्चा सध्या भोरमध्ये जोराने सुरु आहे.

follow us