‘…नाहीतर अनंतराव थोपटे दोनशे टक्के मुख्यमंत्री झाले असते’; संग्राम थोपटेंचं विधान

  • Written By: Published:
‘…नाहीतर अनंतराव थोपटे दोनशे टक्के मुख्यमंत्री झाले असते’; संग्राम थोपटेंचं विधान

Sangram Thopate : १९९९ मध्ये अनंतराव थोपटेंचे (Anantrao Thopate) कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न झाला नसता आणि विधानसभा निवडणुकी (Vidhansabha Eletion) त्यांचा पराभव झाला नसता तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं विधान आमदार संग्राम थोपटेंन केली. थोपटे साहेबांना जाणीवपूर्वक अडचणीत आणून त्यांचे पंख कापण्याचे काम तेव्हा झालं. याचा मोठा फटका कॉंग्रेसला आणि थोपटे साहेबांना बसला. मात्र, सगळ्यात मोठा फटका भोर मतदारसंघाला बसला, असंही संग्राम थोपटे (Sangram Thopate) म्हणाले.

मोठी बातमी : ठरलं! महादेव जानकर एकटेच भंडारा उधळणार; रासपची महायुतीला सोडचिठ्ठी 

संग्राम थोपटेंनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी थोपटे विरुध्द पवार संघर्षावरही भाष्य केलं. ते म्हणाले, १९९९ च्या निवडणुकीवेळी पवारसाहेबांनी विदेशीचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापन केली. तेव्हा कॉंग्रेसचे अनेक नेते त्यांच्यासोबत गेले. मात्र, पतंगराव कदम, विलासराव देशमुख आणि आमचे वडील यांची पक्षावर निष्ठा होती, त्यामुळे ते कॉंग्रेसमध्येच राहिले. त्यानंतर सोनिया गांधींची भोरमध्ये भरपावसात सभा झाली. त्या सभेला ७ ते ८ लाख लोक जमले होते. राष्ट्रवादीची स्थपना झाली असली तरीही कार्यकर्ते हे कॉंग्रेससोबत होते, हे त्या सभेनं दाखवून दिलं, असं थोपटे म्हणाले.

अनंतराव थोपटे दोनशे टक्के मुख्यमंत्री
पुढं ते म्हणाले की, पवारांच्या विरोधात काम करायचं धाडस कुणी करू शकत नव्हतं. त्यावेळी ते विधीमंडळाचे नेते होते. त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी होती. हा व्यक्ती जड जाईल असं वाटल्यानं त्यांना तेव्हा विरोध झाला. तिकीट वाटपाच्या निमित्ताने ते पंधरा दिवस दिल्लीला होता. तेव्हा त्यांचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न झाला, त्यांना थांबण्याचा त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं १९९९ च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. नाहीतर अनंतराव थोटपे दोनशे टक्के मुख्यमंत्री झाले असते. कारण, ते विधीमंडळाचे नेते होते, शिवाय, ते कॉंग्रेसचे सिनियर नेते होते.

मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर भोर मतदारसंघाचा मोठा विकास झाला असता. मात्र, मंत्रीपद हुकल्याने भोर मतदारसंघाचं मोठं नुकसान झालं, अशी खंतही संग्राम थोपटेंनी व्यक्त केली.

संग्राम थोपटेंच्या पाठीशी उभा राहिलं, या शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारलं असता संग्राम थोपटे म्हणाले की, शरद पवार कायमच थोपटे घराण्याच्या पाठीशी राहिलेत. राजकीय विरोध असेल, पण ते तेवढ्यापुरतचं. त्यांच्यात आणि थोपटे साहेबांमध्ये काही राजकीय मतभेद असतीलही पण, त्याला आता बरीच वर्ष उलटली. आता आमची दुसरी पीढी राजकारणात आहे. तोच कित्ता किता काळ गिरवणार? असा सवाल करत राजगड सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली, तेव्हा तेव्हा पवारासाहेबांनी निधी उपलब्ध करून दिल्याचं संग्राम थोपटेंनी सांगितलं.

लोकसभेला सुळेंचं काम केलं…
१९९९ नंतर चार निवडणुका झाल्या. या प्रत्येक निवडणुकीत आघाडी झाली. अपवाद फक्त २०१४ ची विधानसभा निवडणूक. बाकी प्रत्येक वेळेस आम्ही आघाडीचंचं काम केलं. आताही अनेकांना उत्सुकता आहे की, थोपटे कुटुंब अजितदादांचं काम करणार की, पवारासाहेबाचं. मात्र, आम्ही महाविकास आघाडीचं काम करणार. लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेंचं काम केलं. पक्षाने जो आदेश दिला, तो आदेश पाळणारी लोक आहोत आम्ही, असं संग्राम थोपटेंनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube