मोठी बातमी : ठरलं! महादेव जानकर एकटेच भंडारा उधळणार; रासपची महायुतीला सोडचिठ्ठी
मुंबई : विधानसभेच्या रणधुमाळीत महायुतीसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली असून, महादेव जानकर यांनी महायुतीला (Mahayuti) सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. जानकरांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचाही नारा दिला आहे. जानकरांनी महायुतीकडे विधानसभेसाठी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महादेव जानकर (Mahadev Jankar) नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता जानकरांनी महायुतीला सोडचिठ्ठी देत विधानसभेसाठी एकला चालो रे चा नारा दिला आहे. (Mahadev Jankar Exit From Mahayuti)
चंद्रकांतदादा, फडणवीसांसह 10 जणांचे मतदारसंघ ठरले; सहा विद्यमान मंत्र्यांना पहिल्या यादीतून डच्चू
विधानसभेसाठी सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांमध्ये महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या जानकारांच्या रासपने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपांच्या चर्चांमध्ये रासपला सामावून घेतले नाही अशी तक्रार जानकरांची आहे. याबाबतची नाराजी जानकरांनी बोलून दाखवली असून, आगामी काळात होणाऱ्या विधानसभांसाठी रासपनं महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
‘पिपाणी’ चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही; पवारांच्या नातवाला फुल्ल विश्वास
रासप देशात मोठा पक्ष झाला पहिजे
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जानकर म्हणाले की, मी कुणावरही नाराज नसून राष्ट्रीय समाज पक्ष हा देखील देशात मोठा पक्ष होऊन काँग्रेस आणि भाजपच्या लायकीला आला पाहिजे. त्यासाठीच आम्ही एकटे लढणार असून आमची ताकद नेमकी किती हे पाहणार असल्याचे जानकर म्हणाले. एवढेच नव्हे तर, विधानसभेत आमचा पक्ष सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याचेही जानकरांनी जाहीर करून टाकले.
जरांगेंनी शड्डू ठोकला! मुलाखतींसाठी अंतरवालीत या; लढायचं की, पाडायचं यावर 20 तारखेला फैसला
लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली त्याबद्दल अभिनंदन पण यावेळी आम्हाला आमची ताकद किती आहे हे बघायचे आहे. आमच्या पक्षाला मान्यता मिळण्यासाठी कमीत कमी 12 आमदार किंवा दोन खासदार होणं गरजेचं आहे. या अटी पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमचे 10 ते 15 आमदार निवडून आणले पाहिजे. त्यामुळे आमच्या पार्लामेंट्री कमिटीनं सर्वच्या सर्व 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 288 जागा लढवणार असल्याची घोषणा करण्यासोबतच जानकरांनी झारखंडमध्येही जागा लढवणार असल्याचे जानकरांनी सांगितले.
एका कार्डात मावणार नाहीत एवढी कामं; प्रगतीचा पाढा वाचत शिंदेंनी दिला ‘करेक्ट’ कार्यक्रमाचा इशारा
वरिष्ठांनी संपर्क केला तरी आता माघार नाही
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी काळात पुन्हा सोबत येण्याबाबत विचारणा झाली तर काय निर्णय असेल. त्यावर उत्तर देताना जानकर म्हणाले की, आता कुणाचाही फोन आला तरी माघार घ्यायची नाही हे निश्चित झाल्याचे जानकरांमी जाहीर करून टाकले.