महादेव जानकर यांच्या पुतण्याचे काकाविरोधात बंड : मलाही राजकारणात यायचंय

  • Written By: Published:
महादेव जानकर यांच्या पुतण्याचे काकाविरोधात बंड : मलाही राजकारणात यायचंय

Swarup Jankar letter to uncle Mahadev Jankar : काकांविरोधात पुतण्यांचे बंड राज्याने अनुभवले आहेत. शरद पवारांविरोधात अजित पवारांनी केलेले बंड आताच आपण पाहिले आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्याविरोधात त्यांचा पुतण्या स्वरूप जानकरही बंडाच्या भूमिकेत आहेत. तशी जाहीर पोस्टच स्वरूप यांनी आपले काका महादेव जानकर यांच्याविरोधात लिहीली आहे.

महायुतीतील वाद उफाळला: शिवतारेंना आवरा, अजितदादांच्या शिलेदाराचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

मी स्वरूप जानकर, माझी भूमिकाही स्वतंत्र आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत राजकीय कारस्थानांचा अनुभव आलेला असताना तुम्हाला कुटुंब संस्थेचे महत्व अजून समजले नाही, हे आमचे दुर्दैव आहे, असे स्वरूप यांनी महादेव जानकरांनी उद्देशून म्हटले आहे. तुमच्या राजकारणासाठी कुटुंबाशी संबंध ठेवू नका, पण तुमची मते लादू नका, ही नम्र विनंती आहे. तुमचा एकमेव पुतण्या म्हणून सांगतो की, मला तूमची भूमिका मान्य नाही. कारण मला राजकारणात काम करायचे आहे. मलाही राजकीय विचार आहे आणि त्याप्रमाणे काम करण्याचा अधिकार असल्याची त्यांनी म्हटले आहे.

Ranji Trophy: विदर्भाने नांग्या टाकल्या ! अजिंक्य रहाणे मुंबईसाठी संकटमोचक

माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार?
महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. ही जागा शरद पवार हे जानकरांसाठी सोडण्यास तयार आहेत. स्वरूप जानकर यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे मी राजकारणात येऊ शकतो आणि प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवूही शकतो. तुम्हाला मदत हवी असेल तर तीही करीन, पण राजकीय भूमिकेपासून मला आता रोखता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

तुमची प्रतिमा मोठी होते, पण कुटुंबियांचे खच्चीकरण

कॅबिनेट मंत्री होऊनही तुमचा संघर्ष कायम आहे. या वाटचालीत तुमच्या कुटुंबियांनीही संघर्ष केला आहे, हे तुम्हाला सांगण्याची आता वेळ आली आहे. कारण तुमच्याकडून कुटुबियांच्या नशिबी सातत्याने उपेक्षा आलेली आहे. त्यापाठीमागे तुमचा आदर्शवादी राजकारणाचा विचार असला तरी तुम्ही स्वतःचे भाऊ, बहीण सोडून राजकीय नेत्यांमध्ये भाऊ, बहीण शोधायला लागलात आणि त्यातून हाती काय लागले, हे जगजाहीर आहे. तुम्ही कधीही कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करून राजकीय निर्णय घेतलेले नाहीत. आज परभणीच्या सभेत बोलताना तुम्ही, माझा पुतण्या राजकारणात येणार नाही, असे सांगितले. अशी वक्तव्ये तुम्ही अधूनमधून करत असता. त्यातून तुमची प्रतिमा मोठी होते, मात्र कुटुंबियांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोपही स्वरूप जानकर यांनी केलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube