ब्रेकिंग : पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग; भाजप पदाधिकारी कोंढारेला अटक

  • Written By: Published:
Letsupp Image   2025 06 25T112014.758

BJP Pramod Kondhare Arrested In Senior female Police officer Molested Case : पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molested) करणाऱ्या भाजप पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढारेला अटक करण्यात आली असून, कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा (BJP) अध्यक्ष आहे. कोंढरेला अटक करण्यासाठी मंत्रालयातून आदेश आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांकडून कोंढारेला अटक करण्यात आली आहे. कोंढरे याच्यावरती यापूर्वीदेखील पुण्यातील डेक्कन पोलिसात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.

कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर, बुधवार पेठेचं.. पुण्यात ठाकरे गटाचा बॅनर वॉर

गडकरींच्या दौऱ्यावेळी घडला प्रकार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुणे दौऱ्यात एका भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही घटना 23 जून 2025 रोजी शनिवारवाडा परिसरात घडली. प्रमोद कोढरे नावाच्या पदाधिकाऱ्याने गर्दी नियंत्रण करत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप आहे.

अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; चांदीच्या ताटातून सदस्यांचा शाही जेवणावर ताव

हेमंत रासनेंसमोर घडला प्रकार?

धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार भाजप आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडल्याचे फुटेज समोर आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद घातला आणि वादावेळी कोंढारे यांनी अधिकाऱ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांच्या अंगाला स्पर्श करून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारानंतर कोंढारेविरोधात  भारतीय दंड विधान कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता विश्रामबाग पोलिसांनी कोंढारेला अटक केली आहे. BJP Pramod Kondhare Arrested In Senior female Police officer Molested Case

अरुण तनपुरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; पुतणे प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेणार?

प्रमोद विठ्ठल कोंढरेविरोधात दाखल असलेले गुन्हे

1) खडक पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 285/2015 IPC 385,506,507

2) विश्रामबाग पोलीस स्टेशन 336/2010 IPC 452, 143, 147, 149, 427, 506

3) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 3140/2011 IPC 188, 34

4) डेक्कन पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 57/2022 IPC 354, 504, 506, 43

 

follow us