मोठी बातमी! ठाकरे गटाचा दहिसरमध्ये उमेदवार ठरला, तेजस्वी घोसाळकरांनी घेतला एबी फॉर्म….

  • Written By: Published:
मोठी बातमी! ठाकरे गटाचा दहिसरमध्ये उमेदवार ठरला, तेजस्वी घोसाळकरांनी घेतला एबी फॉर्म….

Tejasvi Ghosalkar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) ठाकरे गटाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या. मात्र, या याद्यांमध्ये दहिसर मतदारसंघातून (Dahisar Constituency) अद्याप कुणालाही उमेदवारी दिली नव्हती. दरम्यान, आता ठाकरे गटाकडून (UBT) मोठा निर्णय घेण्यात आला. ठाकरे गटाने दिवंगत अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे गटाचा दहिसरमध्ये उमेदवार ठरला, तेजस्वी घोसाळकरांनी घेतला एबी फॉर्म…. 

काही महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्ह करत असताना अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणामुळं अवघा महाराष्ट्र हादरला होता. आता घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर दहिसरमधून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आज तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन एबी फॉर्म घेतला. यावेळी तेजस्वी यांचे सासरे आणि माजी आमदार विनोद घोसाळकर हे देखील उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड 50 जागा स्वबळावर लढणार, राजेंद्र शिंगणेंविरोधात दिला पहिला उमेदवार… 

लोकसभा निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. भूषण पाटील यांचा पराभव झाला. तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून येथून निवडणूक लढवावी, असा पर्यायही समोर ठेवण्यात आला होता. मात्र हा पर्याय तेजस्वी घोसाळकर यांनी नाकारला होता. आता ठाकरे गटाने त्यांना एबी फॉर्म दिला आहे.

दरम्यान, या जागेसाठी तेजस्वी यांचे सासरे विनोद घोसाळकर इच्छुक होते. मात्र मातोश्रीचा तेजस्वी घोसाळकर यांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीमुळे दहिसरमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दहिसरमध्ये भाजपच्या मनीषा चौधरी यांचं आव्हान तेजस्वी यांच्यापुढे आहे. त्यामुळं या मतदारसंघात तेजस्वी घोसाळकर कशी लढत देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube