महायुतीत टोकाचा संघर्ष! ‘जनतेच्या मनातील आमदार..’ धंगेकरांच्या बॅनरबाजीने रासनेंना डिवचलं, कार्यकर्ते नाराज

महायुतीत टोकाचा संघर्ष! ‘जनतेच्या मनातील आमदार..’ धंगेकरांच्या बॅनरबाजीने रासनेंना डिवचलं, कार्यकर्ते नाराज

Ravindra Dhangekar Entry Scare Hemant Rasane Pune : पुण्यात (Pune) महायुतीच्या नेत्यांचा संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेत प्रवेश करताच रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेत प्रवेश करताच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार हेमंत रासने यांना डिवचल्याचं समोर आलंय.

कसबा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी काही बॅनर लावले आहेत. वाढदिवसानिमित्त लावलेल्या या फ्लेक्सवर ‘जनतेच्या मनातील आमदार’ अशा आशयाचा उल्लेख केलाय. विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघात (Mahayuti) हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकरांचा पराभव केला होता. आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारचे बॅनर लावून हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय.

पुणे अन् अहिल्यानगरमध्ये मुक्काम; मग प्लेनऐवजी ट्रॅव्हल्सनं गाठलं ‘प्रयागराज’; ‘खोक्या’नं सहा दिवसांत काय काय केलं?

या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण असल्याची माहिती मिळतेय. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे शिंदेसेनेचे स्थानिक शिलेदार अस्वस्थ झाल्याचं देखील वृत्त आहे, तर दुसरीकडे पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देखील जाहीर नाराजी व्यक्त करण्यात सुरूवात केलीय. त्यामुळे कदाचित पुण्यात महायुतीतील अंतर्गत संघर्ष येणाऱ्या काळात आणखीन तीव्र होवू शकतो, यामुळे आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिंदेंचा आमदाराच्या अडचणी वाढल्या, अभिनेत्रीने थेट पोलीस ठाणं गाठलं; धक्कादायक प्रकरण समोर

धंगेकरांनी महायुतीत आल्यानंतर आधी राष्ट्रवादी आणि आता भाजपला (BJP) सुद्धा फैलावर घेतलंय. पुण्यात महायुतीत टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश करताच कसबा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापलंय. धंगेकर यांच्या समर्थकांनी जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावून भाजप आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube