पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, ‘या’ कामांचं करणार उद्घाटन

पंतप्रधान मोदी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन यांच्या हस्ते होणार आहे. संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.

Modikkasm

Modikkasm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवार (दि. 10) रोजी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. (Mumbai) उद्या गुरुवारी ब्रिटनच्या पंतप्रधानांशी त्यांची चर्चा होणार असून, फिनटेक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका म्हणून ओळल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन वर्ष पूर्ण होत आहे. आता गुरुवारपासून मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.

पंतप्रधान मोदी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची उपकंपनी आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. लंडनस्थित झहा अदीद या जगविख्यात वास्तूविशारद कंपनीने या विमानतळाचे डिझाइन केले आहे. भारताचे राष्ट्रीय फुलावर म्हणजेच कमळावर आधारित, स्टील आणि काचेपासून तयार केलेले ‘फ्लोटिंग लोटस’ हे या या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे आकर्षण असणार आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळी आणि छठनिमित्त रेल्वे प्रवाशांना गिफ्ट अन् 4 नवीन मर्गांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात राजभवनात गुरुवारी चर्चा होणार आहे. यानिमित्ताने राजभवनाचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. पंतप्रधान स्टार्मर यांची पहिलीच भारत भेट आहे. राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय प्रश्नांवर चर्चा केली जाते. त्यानंतर मुंबई किंवा अन्य शहरांच्या भेटीचा दौऱ्यात समावेश असतो. स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत भेटीत फक्त मुंबईचाच समावेश आहे. गुरुवारी सकाळी मोदी आणि स्टार्मर यांच्यात बैठक होणार आहे. त्यानंतर संयुक्त निवेदन सादर करतील. त्यानंतर ते ‘ग्लोबल फिनटेक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये अलीकडेच झालेला मुक्त व्यापार करार, व्यापाराच्या संधी, तंत्रज्ञान यावर उभयतांमध्ये चर्चा अपेक्षित आहे.

मुंबईत दोन पंतप्रधानांमध्ये होणारी ही अनेक वर्षांनंतरची चर्चा असेल. याआधी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात काही राष्ट्रांच्या प्रमुखांबरोबर मुंबईत चर्चा झाली होती. १९६४ मध्ये पोप सहावे यांच्या मुंबई भेटीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत आले होते. पोपना राष्ट्रप्रमुखांचा दर्जा आहे.बिल क्लिंटन व बराक ओबामा या अमेरिकेच्या तात्कालीन राष्ट्राध्यक्षांनी भारत दौऱ्यात मुंबईला भेट दिली होती. पोप जाॅन पाॅल सहावे, पोप जाॅन पाॅल दुसरे, इंग्लडची राणी एलीझाबेथ यांच्यासह विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी मुंबईचा दौरा केला आहे.

Exit mobile version